Pune Ganeshotsav Road Map Sakal
पुणे

Pune Ganeshotsav : पुण्यात गणपती दर्शन करत आहात? पर्यायी मार्गाचा 'हा' नकाशा सोबत ठेवा

Pune Ganpati Darshan guide: बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. काही प्रमुख गणेश मंडळे, वाहनतळ आणि स्वच्छतागृहांची माहिती सोबतच्या नकाशामध्ये.

सकाळ वृत्तसेवा

Pune Ganpati Darshan: मध्यवस्तीत मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या सोयीसाठी वाहतूक शाखेने शाळा महाविद्यालयांमध्ये वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली आहे. बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. काही प्रमुख गणेश मंडळे, वाहनतळ आणि स्वच्छतागृहांची माहिती सोबतच्या नकाशामध्ये.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

स्वच्छतागृहांची व्यवस्था : महापालिकेने भाविकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कायमस्वरूपी स्वच्छतागृहे २४ तास खुले राहणार आहेत. पण, गर्दी लक्षात घेता मोबाईल टॉयलेटही उपलब्ध करून दिले आहेत.

स्वच्छतागृहांमुळे दुर्गंधी निर्माण होऊ नये, यासाठी यांत्रिकी पद्धतीने दिवसातून दोन वेळा स्वच्छता केली जाणार आहे. मध्यवर्ती पेठांमधील प्रमुख रस्त्यांसह नदीपात्रामध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना ‘टॉयलेट सेवा’ ॲपमधून स्वच्छतागृह शोधण्यासाठी मदत होणार आहे.

येथे आहेत स्वच्छतागृहे

Pune Ganeshotsav Map

गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीस बंद रस्ते अन् पर्यायी मार्ग लक्ष्मी रस्ता

(हमजेखान चौक ते टिळक चौक)

पर्यायी मार्ग : डुल्या मारुती चौकाच्या उजवीकडे वळून दारूवाला पूलमार्गे इच्छितस्थळी हमजेखान चौकाच्या डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने सरळ घोरपडे पेठ पोलिस चौकीपुढे शंकरशेठ रस्त्याने इच्छितस्थळी सोन्या मारुती चौकाच्या डावीकडे वळून मिर्जा गालिब रस्ता जंक्शन उजवीकडे वळून मंडईतून डावीकडे वळून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता

(गाडगीळ पुतळा ते जेधे चौक)

पर्यायी मार्ग : शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी स. गो. बर्वे चौक-जंगली महाराज रस्ता-टिळक चौक-टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा किंवा सिमला चौक-कामगार पुतळा चौक-शाहीर अमर शेख चौक-बोल्हाई चौक मार्गे नेहरू रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने जाता येईल कुंभार वेस चौक-पवळे चौक-साततोटी चौक-देवजीबाबा चौक-हमजेखान चौक-महाराणा प्रताप रस्त्याने घोरपडे पेठ पोलिस चौकी-घोरपडे पेठ उद्यान-झगडे आळी ते शंकरशेठ रस्ता वाहतुकीच्या परिस्थितीनुसार दुचाकी वाहने गाडगीळ पुतळा, लाल महालापर्यंत सोडण्यात येतील. तेथून दुचाकी वाहनचालकांनी डावीकडे वळून फडके हौद चौकमार्गे दारूवाला पूलमार्गे इच्छितस्थळी

बेलबाग चौक ते रामेश्वर चौक सर्व वाहनांसाठी बंद राहील पर्यायी मार्ग : शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या मिनी पीएमपी बस आणि इतर हलकी वाहने बेलबाग चौकातून सेवासदनमार्गे लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकातून टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने जातील शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने टिळक चौकमार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जातील शिवाजी रस्त्यावरून पुणे स्टेशन आणि हडपसरकडे जाणाऱ्या बस गाडगीळ पुतळा-कुंभारवेस-शाहीर अमर शेख चौक-बोल्हाई चौक-नेहरू रस्त्याने इच्छितस्थळी बाजीराव रस्ता

Pune Ganeshotsav Map

(पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक)

पर्यायी मार्ग :पुरम चौक-टिळक रस्त्याने टिळक चौकातून उजवीकडे वळून केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक पुरम चौक ते गाडगीळ पुतळा चौकदरम्यान असलेल्या एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर टेलिफोन भवन ते पुरम चौकादरम्यान तात्पुरती दुहेरी वाहतूक करण्यात येईलटिळक रस्ता

(मराठा चेंबर ते हिराबाग चौक)

पर्यायी मार्ग : जेधे चौक, नेहरू स्टेडियमसमोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पुरम चौक आणि हिराबाग चौक

बंद असलेले इतर मार्ग

  • सिंहगड गॅरेज,

  • घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक

  • दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक

  • सणस रस्ता-गोटीराम भैया चौक ते गोविंद हलवाई चौक

  • गावकसाब मशीद ते सेंट्रल स्ट्रीट चौकी

  • कोहिनूर चौक ते बाबाजान चौक

  • जेधे प्रसाद रस्ता-पार्श्वनाथ चौक ते शास्त्री चौक

येथेही पार्किंग

  • नीलायम टॉकीज

  • मित्रमंडळ सभागृह

  • पाटील प्लाझा पार्किंग

  • हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक

  • सारसबाग, पेशवे पार्क

  • पर्वती ते दांडेकर पूल  

  • दांडेकर पूल ते गणेश मळा

  • गणेश मळा ते राजाराम पूल

  • एसएसपीएमएस

  • महाविद्यालय (आरटीओ कार्यालयाशेजारी)

नो पार्किंग

  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता

  • जिजामाता चौक ते मंडई चौक

  • मंडई ते शनिपार चौक

  • बाजीराव रस्ता शनिपार

  • ते फुटका बुरूज

  • अप्पा बळवंत चौक ते

  • बुधवार चौकापर्यंत

Pune Ganeshotsav Map

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT