Ramesh Pardeshi_Pune
Ramesh Pardeshi_Pune 
पुणे

Pune Girls Drug Matter: ड्रग्ज घेऊन तरुणी आऊट ऑफ कन्ट्रोल! अभिनेत्यानं शेअर केला काळजीत टाकणारा व्हिडिओ

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे शहर गेल्या तीन दिवसांपासून एका गंभीर प्रकरणासाठी चर्चेत आलं आहे. शहरात ११०० कोटी रुपयांचं ६०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर आज संध्याकाळी पुण्यातील वेताळ टेकडीवर दोन कॉलेज तरुणींनी ड्रग्जचं सेवन केल्यानं ऑऊट ऑफ कन्ट्रोल झाल्याचं पहायला मिळालं आहे.

अभिनेता-दिग्दर्शक रमेश परदेशी यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे. यामुळं पुण्याची तरुणाई भरकटत चालल्याचं हे प्रातिनिधीक उदाहरण समोर आल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. (Pune girls drugs matter actor director ramesh pardeshi shared a disturbing video)

रमेश परदेशी यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितलं की, वेताळ टेकडीवर आम्ही पळायला आलो होतो. तर इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी ४ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे. (Marathi Tajya Batmya)

शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे शहर हे आता नशेचं माहेरघरं होतंय का? याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा. पुण्यातील टेकड्यांवर लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी येतात तिथं ही तरुण मुलं मुली अशा प्रकारे नशा करतात. आपल्या आई-वडिलांना माहिती नसतं की मुलं नक्की काय करतात बाहेर. (Latest Marathi News)

त्यामुळं आपण एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडं गांभीर्यानं बघणार आहोत की नाही. पुण्यात ४ हजार कोटी ड्रग्ज सापडलं पण पुणेकरांनी यावर साधी एक प्रतिक्रिया दिलेली नाही. मागे ललीत पाटील सापडला आणि आता हे. त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला. पण यामुळं तरुण पिढी बरबाद होत आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करणार आहोत का नाही? जर आत्ताच काही केलं नाहीतर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही, अशी खंतही यावेळी रमेश परदेशी यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT