Pune Graduate Election 2020 Pravin Darekar Taunt Sanjay Raut  
पुणे

संजय राऊत यांनी आत्मविश्वास गमावला, प्रवीण दरेकरांचा टोला

सकाळवृत्तसेवा

पुणे : खासदार संजय राऊत यांचा आत्मविश्वास गमावला आहे. त्यांच्या बोलण्यात पूर्वीइतका विश्वास दिसत नाही. मुंबईकर ठरवतील सत्तेचा झेंडा कोणाकडे द्यायाचा? त्यामुळे  मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा असेल, याचे कोणाकडे पेटंट नाही.'' अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

''भाजपने केलेली कामे आणि पक्षाची भविष्यातील धोरणे पाहता या पक्षावर पदवीधरांचा विश्वास आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांना मतदारांची पसंती मिळेल. असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ते  पुढे म्हणाले की, ''राज्य सरकारमधील घटक पक्षांत ताळमेळ नाही. कॉलेज बंद आहेत, परीक्षा नाहीत, अभ्यासिका बंद आहेत, त्यामुळे सरकारचे धोरण कळत नाही. या मतदारांत चीड आहे.
''
 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''भाजपचे देशमुख निवडून आल्यास पदवीधरांना नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. या घटकाला उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देऊ'' असे आश्वासन दिले.

''पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातूनही तिकिट न मिळाल्याने पुण्यातील इच्छुक महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे नाराज नाहीत. कुलकर्णी नाराज नाहीत, त्यांची काळजी भाजप घेईल. आमच्याकडे मतभेद नाहीत. राज्य सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसची फरपट करीत आहे. हे या पक्षाला कळायला हवे.'' अशी माहिती  दरेकर यांनी यावेळी बोलताना दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samosa Health Risk : एका समोशासाठी द्यावे लागतील ३ लाख रुपये; डॉक्टरांनी सांगितले थेट हृदयाशी कनेक्शन

‘बाबो... जान्हवी परतली तनुजा बनून!’ लक्ष्मी निवास मालिकेतला खतरनाक ट्वीस्ट, जान्हवीचा स्मृतीभ्रश होणार?

Latest Marathi News Live Update : पावसाचा हाहाकार! शिरपूर तालुक्यात मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान

Work From Home Scam : ‘झुकती है दुनिया.. झुकानेवाला चाहिये’ म्हणत, ‘वर्क फ्रॉम होम’ दिलं अन् कोट्यवधींची केली फसवणूक, अगरबत्ती पॅकिंग घोटाळा

Saree Style Tips : साडी म्हणजे संस्कृती! सोनाली पाटीलने सांगितले, साडी का आहे तिचा 'सर्वांत कंफर्टेबल वेअर'?

SCROLL FOR NEXT