pune  sakal
पुणे

Pune : भावडी येथील हातभट्टी लोणी कंद पोलिसांकडून उध्वस्त

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टी, दारू,गांज्या, मटका, गुटखा,जुगार,सोरट,हुक्का यासारखे अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिला

सकाळ डिजिटल टीम

Pune - भावडी (ता.हवेली) येथील हांडगर वस्ती जवळ इंद्रायणी नदीच्या काठावर चालू असलेल्या अवैध हातभट्टीवर लोणीकंद पोलिसानी छापा टाकून उध्वस्त केली.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारूचे अवैध धंदे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.

नागरिकांच्या या तक्रारीनंतर लोणीकंद पोलिसानी भावडी येथील इंद्रायणी नदीच्या काठावर सुरू असलेल्या हातभट्टी दारू बनविण्याच्या अड्ड्यावर छापा टाकून भट्टी उध्वस्त केली.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे,पोलीस नाईक सागर जगताप,पोलीस शिपाई पांडुरंग माने,आशिष लोहार,मल्हारी सपुरे यांनी ही कारवाई केली.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टी, दारू,गांज्या, मटका, गुटखा,जुगार,सोरट,हुक्का यासारखे अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT