Pune Heavy Rain Update
Pune Heavy Rain Update eSakal
पुणे

Pune Rain : येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ओझर परिसरात ढग फुटी सदृश्य पाऊस

सकाळ डिजिटल टीम

नारायणगाव : येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ओझर परिसरात सोमवार (ता.17) रोजी ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. रात्री साडे अकरा पर्यत ९७ मिलिमीटर पाऊस झाला. या मुळे रात्री साडे अकरा नंतर येडगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रात्री साडे अकरा वाजता धरणातून कुकडी नदी पत्रात साडेसात हजार क्युसेक्सने पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पिंपळगाव जोगा धरणाच्या मढ खोऱ्यामध्ये रात्री ९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वच धरणाच्या पाणी पातळीवर अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.अशी माहिती कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग प्रशांत कडुसकर यांनी दिली.आज सायंकाळी सहानंतर जुन्नर तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली . रात्री साडे अकरा पर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. नारायणगाव परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे .मागिल तीन दिवसा पासून तालुक्यात पाऊस सुरू असल्याने प्रामुख्याने नवीन फूट झालेल्या द्राक्ष बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! ED अन् इतर तपास यंत्रणांना चपराक, काय दिला निर्णय?

Medicine Rate: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Air India : टॉयलेटमध्ये बसला, टिश्यू पेपरवर लिहिलं 'बॉम्ब', एअर इंडियाच्या विमानात खळबळ

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Healthy Diet: ‘पावडर प्रथिनां’च्या अतिसेवनामुळे शरीराला धोका; खेळाडूंना डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT