Rain Sakal
पुणे

Pune Rain: पुण्यात विजेच्या गडागडाटासह दमदार पावसाची हजेरी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील काही भागांत दमदार पावसाला सुरूवात झाली असून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात दुपारनंतर असाच पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

(Pune Rain Latest Updates)

तर दोन तीन दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती तर राज्यातील काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली होती. तर आता परतीच्या पावसाला सुरूवात होत असून आता पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. तर काही भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे.

दरम्यान, अनेक दिवसांपासून पावसाची उघडीप पुणे आणि शहर भागांत पाहायला मिळत आहे. दोन ते तीन दिवसांच्या टप्प्याने पावसाला सुरूवात होत असते. तर आता परतीच्या पावसामुळे दुपारनंतर असाच पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर शहरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

तर या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोयाबीन पीक काढायला आले असताना पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला आहे. तर काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला यामुळे फटका बसला आहे. तर कापसाच्या भावावरही पावसामुळे परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: रत्नागिरीत निकालाआधी धडधड वाढली, सत्तेचं गणित कोणाच्या बाजूने झुकणार?

Zilla Parishad Elections Result : निकालाआधीच महायुतीने मारली बाजी, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या २७ जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची यादी!

ZP election counting update : कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल किती वाजता लागणार?, प्रशासनाची जय्यत तयारी

Sindhudurg ZP Election Results : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांचा कौल कुणाला? आज चित्र होणार स्पष्ट; सावंतवाडीत सर्वाधिक ६९.८४ टक्के मतदान

Satara ZP Election Results : राजकारणातला 'गब्बर' साताऱ्यात बाजी मारणार? बहुमतासाठी 33 जागांचं गणित; पहिला निकाल 11 पर्यंत लागणार!

SCROLL FOR NEXT