Heavy Rain esakal
पुणे

पुणे : पावसामुळे वाहतूक मंदावली

काही महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य वस्तीसह उपनगरांतील रस्त्यावर असखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने; तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर काही महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.

पुणे स्टेशन परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. आज सकाळपासूनच शहरात पावसाने हजेरी लावल्याने वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता यांसह विविध भागात वाहतूक कोंडीसदृश्य स्थिती आहे.

सकाळी आठ ते ११ दरम्यान वाहतूक मंदावली होती. त्यानंतर पावसाचा जोर आणि रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र दुपारी चारनंतर पुन्हा पाऊस व रस्त्यावरील वाहने वाढल्याने वाहन चालकांना कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. प्रमुख रस्त्यावर कोंडी झाल्याने वाहनचालकांनी गल्ली बोळातील रस्त्याने इच्छित स्थळी जाण्यास सुरवात केली. त्यामुळे छोट्या रस्त्यांवर वर्दळ वाढून त्यावर देखील टप्प्या-टप्प्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

काही चौकात सिग्नल बंद :

पावसामुळे काही प्रमुख चौकातील सिग्नल बंद पडले होते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली. मात्र वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवर अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे. काही भागात झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतुकीवर परिमाण झाला.

गुगल मॅप दाखवत असलेल्या प्रवासाच्या वेळ (दुचाकीसाठी)

निघण्याचे ठिकाण - पोहचण्याचे ठिकाणी - वेळ (मिनिटं) - किमी

महापालिका - पुणे स्टेशन- १६ - ३

कात्रज- शिवाजीनगर - ३३ - १०

स्वारगेट - शिवाजीनगर - २० - ५.६

कर्वेनगर - कॅम्प - २५ - ९.२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

Latest Marathi News Live Update : लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कॅप्टन खरातच्या ऑफिस बॉयवरही गुन्हा दाखल

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

SCROLL FOR NEXT