in pune high-voltage power lines are being laid only six inches below the ground 
पुणे

मृत्यूचा सापळा 'सहा इंचावर'; महावितरण, विद्युत नियंत्रण समिती सदस्यांचा आरोप 

सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी : विमाननगरमध्ये उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करताना त्या फक्त सहा इंचावर टाकण्यात येत आहेत. सहा इंचांवर असणाऱ्या या मृत्यूच्या सापळ्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याला जबाबदार असलेल्या महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी थेट मागणी विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यांनीच केली आहे. विमाननगर भागामध्ये रस्ते आणि पदपथ खोदून विद्युत वाहिन्या टाकण्यात येत आहेत. या विद्युत वाहिन्या विस्तारित विमानतळाला विद्युत पुरवठा करण्यासाठीच्या योजनेचा भाग असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. मात्र हे काम ज्या ठिकाणी सुरू आहे तेथे कोठेही सदर कामाची माहिती लिहिलेला फलक आढळून येत नाही. तसेच हे काम करताना ठेकेदाराला घालून दिलेल्या नियम, अटी व शर्तींचा भंग झाल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही महावितरणचे अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.

विमाननगर भागांमध्ये म्हाडा रस्त्यावर, गंगा पुरम सोसायटी समोर, आणि विमानतळ रस्त्यावर पदपथ आणि रस्ता खोदून या वीज वाहिन्या टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. विद्युत वाहिन्या तीन फूट खोलीवर टाकल्या जात नसल्याचा प्रकार विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य लिंगु साखरे आणि भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष संतोष राजगुरू , शहर चिटणीस संतोष जाधव यांनी नगर रस्ता विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांच्या निदर्शनास आणून दिला. 

मराठ्यांनी घेतलेला पानिपतचा बदला

याबाबत संतोष जाधव म्हणाले, अनेक ठिकाणी या वीज वाहिन्या फक्त सहा इंच खोलीवर टाकल्या आहेत. वीजवाहिन्या टाकताना खोदलेल्या भागात चांगल्या दर्जाचा अर्धवर्तुळाकार सिमेंटचा पाईप टाकणे या बाबी पाळल्या जात नाहीत. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. म्हणून दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


वडगाव शेरी विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य लिंगु साखरे म्हणाले, काम कोणासाठी असो. विद्युत वाहिन्या टाकताना सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे. अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे काम व्हावे असा नियम आहे. मात्र काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. सर्वत्र कामाचा राडारोडा पसरला आहे. यामध्ये ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे हितसंबंध आहेत.  या कामाच्या आदेशाची प्रत पाहण्यासाठी सकाळ' ने कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी नगर रस्ता विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव म्हणाले, विद्युत वाहिन्या नियमांची पायमल्ली करून टाकल्या गेल्या असतील तर त्याची चौकशी करून कारवाई करू. सदर कामाच्या आदेशाची प्रत सकाळपासून शोधली. परंतु ती सापडली सापडली नाही.  कामाच्या आदेशाची प्रत सापडल्यावर देऊ.

चाकण, राजगुरुनगर नगरपरिषद हद्दवाढीबाबत उच्च न्यायालयाने दिले आदेश 

विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्यांनी  निकृष्ट कामाविषयी केलेल्या आरोपाबाबत विचारल्यावर कार्यकारी अभियंता म्हणाले, अशी समिती सध्या अस्तित्वात नाही. या सदस्यांचा कार्यकाल संपला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कार्यालयांत आता बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य! GNCTD आणि MCD मध्ये मोठा बदल; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

KKR vs LSG Live: OUT or NOT OUT? अम्पायरला घाई, रिप्ले न पाहताच Finn Allen ला दिले बाद, त्या झेलवरून सुरू झालाय वाद; Video

Tahsildar Rakesh Gidde Death : कष्टाने ‘तहसिलदार’ झाला पण, अर्ध्यावर डाव मोडला! राकेश गिड्डे यांच्या निधनाने सांगलीकर भावूक

Maharashtra 11th admission online: इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाइन नोंदणीला शुक्रवारपासून प्रारंभ; दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग उपलब्ध

Parth Pawar look ajit pawar : पार्थ पवारांनी खासदारकीची शपथ घेतली पण, त्यांचा लूक पाहिला का? अजित दादांची येईल आठवण

SCROLL FOR NEXT