In pune hops of hotel operators are increased due to allowing to start businesses
In pune hops of hotel operators are increased due to allowing to start businesses  
पुणे

हुकलेली संधी पुन्हा मिळाली; हॉटेल, लॉज व गेस्ट हाऊस चालकांच्या वाढल्या अपेक्षा

सनिल गाडेकर

पुणे : कोरोनामुळे अक्षरशः दिवाळे निघालेल्या हॉटेल चालकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिल्याने त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या महिन्यात देखील असे आदेश काढण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनने त्यावर पाणी फिरवले होते. त्यामुळे यावेळी सुद्धा असे काही होणार नाही ना अशी धास्ती त्यांच्या मनात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पार्सल सेवा पुरवणारे वगळता लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शहरातील हॉटेल व्यवसाय पूर्णतः ठप्प आहे. हॉटेलचे भाडे, कामगारांचा पगार,  कर्ज या आर्थिक बाबींचा मेळ घालताना हाती काहीच राहत नसल्याने हे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. गेल्या महिन्यात तर अगदी या सर्वांच्या तोंडचा घास हिसकावण्यात आला होता.

महिनाभरानंतर त्यांना पुन्हा ही संधी उपलब्ध झाली आहे. पण गेल्याच महिन्यात जर आम्हाला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली असती तर आतापर्यंत आमच्या अर्थ चक्राला काहीशी गती मिळाली असती. महिनाभर व्यवसाय बंद ठेवून काय साध्य झाले? असा सवाल हॉटेलचालक करीत आहेत.

रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसला परवानगी मिळाल्याने केवळ जेवण पुरवणारे हॉटेल सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत त्यांना देखील हॉटेल सुरू करण्याची परवानगी मिळू शकते.
 

तर नाहक झालेला खर्च वाचला असता : 
पूर्वी दिलेल्या परवानगीमुळे व्यवसायिकांनी कामगारांना बोलावून घेतले होते. सध्या हे सर्व बसून आहेत. कामावर हजर झाल्याने त्यांना पगारही द्यावा लागत आहे. मागील वेळी परवानगीचा गोंधळ झाला नसता तर आमचा हा सर्व खर्च वाचला असता, अशी भावना हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहे. तेव्हा घेतलेला किराणा आणि दुग्धजन्य पदार्थ देखील आम्हाला कमी भावात इतरांना द्यावे लागले. त्यातील काही माल खराबही झाला होता, असे व्यवसायिकांनी सांगितले.

'लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरीच आहे. व्यवसाय सुरू नसल्याने पगार देऊ शकत नाही,'' असे मालक सांगतात. सुरुवातीच्या काळात त्यांनी काही मदत केली मात्र, आता त्यांचा देखील नाईलाज आहे. पगारच मिळत नसल्याने घरी किराणा मालासाठी देखील पैसे शिल्लक नाही. शहरातील सर्व हॉटेल पूर्ण क्षमतेने परवानगी देणे गरजेचे आहे.
- हॉटेल कामगार

''सर्व हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी याबाबत आमचा पाठपुरावा सुरू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे कामकाज करण्यास आमची तयारी आहे. आतापर्यंत हॉटेल व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करता त्वरित परवानगी द्यावी.''
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT