Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : गावाला जाताना घ्या घराची काळजी ; घरफोड्यांचे प्रमाण वाढले ,सुट्टी व लग्नसराईचा चोरटे घेतायेत फायदा

उन्हाळ्याची सुट्टी आता सुरू झाली आहे. तसेच सध्या लग्नसराईचाही काळ सुरू आहे. त्यामुळे अनेकजण परिवारासह शहराबाहेर जात आहेत. याचाच फायदा घेत चोरी व घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : उन्हाळ्याची सुट्टी आता सुरू झाली आहे. तसेच सध्या लग्नसराईचाही काळ सुरू आहे. त्यामुळे अनेकजण परिवारासह शहराबाहेर जात आहेत. याचाच फायदा घेत चोरी व घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. मात्र घाबरून जाऊ नका. योग्य काळजी घेऊन तुम्ही तुमचे होणारे नुकसान नक्कीच टाळू शकता.

बराच काळ बंद असलेल्या घरांमध्ये सध्या चोरी आणि घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कडी उचकटून, कुलूप तोडून, शटर उचकटून, खिडकीचे गज कापून, गच्चीतून किंवा छतावरून, बनावट चावी करून अशा अनेक प्रकारे घरफोड्या होत असल्याची माहिती पोलिस ठाण्याच्या अनेक नोंदींवरून मिळते.

आकडेवारी काय सांगते?

शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २०२३ मध्ये घरफोडीच्या ६०० घटना झाल्या आहेत. यामध्ये २५ कोटींचा ऐवज चोरीला गेला आहे. यापैकी तीन कोटींचा ऐवज परत मिळाला आहे. जानेवारी २०२४ अखेर ७९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

सुट्टीच्या निमित्ताने किंवा चार-पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस बाहेर जाणार असाल तर आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची काळजी घ्यावी. लग्नात कार्यालयात लहान मुले वा महिलांच्या माध्यमातून दागिन्यांची चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधानता बाळगावी. आजूबाजूला अनोळखी व्यक्तीच्या हालचाली‌ संशयास्पद असतील तर त्वरित पोलिसांना कळवावे.

- भीमराव टेळे, सहाय्यक पोलिस आयुक्त, कोथरूड

सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांकडून सोसायटीत येणाऱ्या प्रत्येकाची माहिती घेतली जाते. पार्किंग परिसरात सुरक्षारक्षक असतात. तसेच होम डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तींना रात्री १० नंतर सोसायटी परिसरात प्रवेश दिला जात नाही. यामुळे घरफोडीसह अनेक गोष्टींना आळा बसण्यास मदत होते.

- हेमेंद्र जोशी, चेअरमन, कलाश्री सोसायटी, नांदेड सिटी

काय करता येईल?

  • बाहेरगावी जाताना घरातील पैसे, दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा.

  • आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती शेजाऱ्यांना द्यावी.

  • महिलांनी प्रवासात दागिने घालणे टाळावे.

  • प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहावे.

  • व्यापारी व दुकानदारांनी रात्रीच्या वेळी दुकानाबाहेर सुरक्षा ठेवावी

  • सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.

पोलिस ठाणे मागील वर्षी झालेल्या घरफोड्या उघड झालेल्या घरफोड्या

  • हवेली २८ ११

  • वारजे २१ १४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT