In pune Ignorance towards doctors in Naidu hospital due to not having a list  
पुणे

नायडू हॉस्पिटलमध्ये गोंधळ कायम; 'या' कारणामुळे डॉक्टर वाऱ्यावर

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनावर उपचार करणाऱया डॉक्टर, परिचारिकांच्या निवासाची व्यवस्था करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने या पूर्वीच दाखविली असल्याचे गुरुवारी उघड झाले. मात्र, नायडू रुग्णालय प्रशासनाने संबंधित डॉक्टर, परिचारिकांची यादीच अद्याप दिलेली नसल्यामुळे तेथील गोंधळ वाढला आहे. त्यामुळे नायडू रुग्णालयाच्या प्रशासनावर कोणाचे लक्ष आहे की, नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे

.ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नायडू रुग्णालयात कोरोनावर उपचार करणाऱया डॉक्टरांची निवास व्यवस्था तेथेच करणे अपेक्षित होते. महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी त्या बाबत पावले उचलणे अपेक्षित होते. परंतु, तेथील काही अधिकारयांच्या निष्क्रीयतेमुळे गेले दोन महिने डॉक्टरांना घरी जावे लागत आहे. एक डॉक्टर तर दररोज चाकण- पुणे अशी ये-जा करीत आहे. कोरोना वॉर्डात उपचार करणाऱया डॉक्टरांची संबंधित रुग्णालयाजवळ राहण्याची व्यवस्था करावी, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. त्यानुसार ससूनमधील काही डॉक्टरांची पुणे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये व्यवस्था झाली आहे. मात्र, नायडूतील डॉक्टर गेल्या दोन महिन्यांपासून राहण्याच्या व्यवस्थेसाठी झगडत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नायडूतील डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला मंगळवारी या बाबत पत्र दिले होते. त्यात राहण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु, महापालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, आरोग्य उपसंचालक
कार्यालयात गुरुवारी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी ते स्वीकारले नाही, अशी माहिती नायडूतील डॉक्टरांनी दिली.

ओझोनच्या वापरातून कोरोना विषाणू नष्ट केला जाऊ शकतो? शास्त्रज्ञ म्हणतात...

या बाबत उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टरांना राहण्याच्या जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे, ही लाजीरवाणी बाब आहे. जिल्हा प्रशासन केवळ डॉक्टरच नव्हे तर परिचारिकांचीही राहण्याची व्यवस्था नजीकच्या काही हॉटेलमध्ये करू शकते. नायडू रुग्णालय प्रशासनाने
संबंधित डॉक्टरांची यादी द्यावी, अशी सूचना आम्ही या पूर्वीही केली आहे. ती यादी अदयाप मिळालेली नाही.

काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुण्यात होतेय हुक्क्याचीही 'होम डिलीव्हरी​

या बाबत नायडू रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर पाटसुते यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, यादीबद्दल मला काही माहिती नाही. बघावे लागेल, असे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था काही केली आहे का, अशी विचारणा केल्यावर त्याबद्दलही ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले

पुणेकर दारूसाठी अपाॅइंटमेंट घेण्यातही आघाडीवर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT