शास्त्रज्ञ  sakal
पुणे

Pune : पुणे IMDचे शास्त्रज्ञ घेणार अंटार्क्टिक मोहिमेत सहभाग

अंटार्क्टिक येथील प्रदूषणाचा होणार अभ्यास

अक्षता पवार

पुणे : भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमा अंतर्गत यंदाच्या अंटार्क्टिक मोहिमेत पुण्यातील शास्त्रज्ञांचा सहभाग असणार आहे. शिवाजीनगर येथील भारतीय हवामानशास्त्र विभागातील (आयएमडी) तीन शास्त्रज्ञांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजेच प्रथमच आयएमडीद्वारे अंटार्क्टिक येथील प्रदूषणाचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे ही मोहीम अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. तसेच मराठमोळ्या शास्त्रज्ञांचा या मोहिमेतील सहभाग ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

आयएमडीचे शास्त्रज्ञ अशोक खुटवड, अजित कोंडे आणि अरुण साबळे या तिघांची निवड अंटार्क्टिक मोहिमेसाठी झाली आहे. यामध्ये आयएमडीसह इतर संस्थांच्या शास्त्रज्ञांना मिळून एकूण २५ शास्त्रज्ञांचा गट मोहिमेत भाग घेणार आहे. बर्फाच्छादित प्रदेश असलेल्या अंटार्टिका खंडात अनेक रहस्य दडलेले आहेत. जागतिक पातळीवर विविध संस्थांच्या वतीने येथील हवामानाचा अभ्यास केला जात आहे. यंदा या मोहिमेत सहभागी झालेल्या खुटवड यांची ही तिसरी मोहीम असून या पूर्वी त्यांनी अंटार्क्टिका येथील मैत्री या संशोधन केंद्रावर काम केले. मात्र यंदा खुटवड आणि कोंडे हे भारती केंद्रावर, तर साबळे हे मैत्री केंद्रावर काम करणार आहेत.

असा असेल प्रवास ः

- रविवारी (ता. ६) पुण्यातून गोव्याला तिघे रवाना

- गोव्यात एक आठवड्यासाठी प्रशिक्षण

- त्यानंतर केपटाऊनमध्ये १० दिवसांचा विलगीकरण कालावधी

- या प्रक्रियेनंतर हवामानाची स्थिती पाहता मैत्री केंद्रावर रवाना

- मैत्री केंद्रावरून विमानाद्वारे सुमारे ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत भारती केंद्रावर पोचणार

- २५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत नेमलेल्या केंद्रावर पोचण्याची शक्यता

- मोहिमेचा कालावधी सुमारे १५ महिन्यांचा

याचा अभ्यास होणार ः

- वाऱ्याची दिशा वेग, ढगांचे निरिक्षण, तापमान, अद्रता अशा १६ घटकांची दर तीन तासांनी नोंदी

- हा संपूर्ण डेटा जगभरात पुरवला जातो

- डेटाचा वापर हवामान मॉडेलमध्ये भरून त्यानुसार हवामानाचा अंदाज काढणे

- ओझोनच्या थराचे कमी होत असलेले प्रमाण

- जागतिक तापमान वाढीचा अभ्यास

- सूर्य किरणांमुळे ऊर्जा उत्सर्जनाचा अभ्यास

प्रदूषणाचा अभ्यास ः

अंटार्क्टिका येथे बर्फवृष्टी होते. तिथे पाऊस पडत नाही, त्यामुळे प्रदूषणाचा हवा आणि पाण्यावरील परिणाम पाहण्यात येणार आहे. प्रदूषणाची स्थिती नेमकी कशी आहे हे समजण्यासाठी तेथील बर्फ, तलाव आणि समुद्रातील पाण्याचे नमुने या मोहिमे दरम्यान संकलित केले जाणार. तसेच या नमुन्यांची अभ्यास पुण्यात आयएमडीच्या प्रयोगशाळेत होणार आहे. या प्रयोगशाळेत देशातील १४ स्टेशन्सच्या प्रदूषणाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे अंटार्क्टिकातून आणलेल्या या नमुन्यांची तुलना करत अभ्यास केला जाईल. असे खुटवड यांनी सांगितेल.

मोहिमेपूर्व प्रशिक्षण ः

अंटार्क्टिक येथील वातावरणाशी जुळवून घेणे, माउंटेनिअरिंग, अभ्यासासाठी तयारी, आपत्तीच्या काळात संरक्षण कसे करावे अशा विविध गोष्टींचे पूर्ण प्रशिक्षण या शास्त्रज्ञांना देण्यात आले आहे. यासाठी सुमारे दीड महिन्यांचे प्रशिक्षण दिले गेले. यामुळे अंटार्क्टिक मोहिमेदरम्यान कार्य करताना अडचणी उद्भवणार नाही. तसेच आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यातून स्वतःचा बचाव देखील शास्त्रज्ञांना करणे शक्य होईल.

अंटार्क्टिक मोहिमेबाबत ः

- देशात १९८१ मध्ये अंटार्क्टिक मोहिमेला सुरवात

- गेल्या चार दशकांपासून या भागातील अभ्यास मोहीम सुरू

- भारताचे अंटार्क्टिकात मैत्री, भारती आणि दक्षिण गंगोत्री असे तीन कायमस्वरूपी संशोधन केंद्र

- सध्या अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारती ही दोन कार्यान्वित संशोधन केंद्रे

- मोहिमेचे संपूर्ण व्यवस्थापन गोव्यातील ‘नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च’द्वारे (एनसीपीओआर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT