Ajit Pawar Esakal
पुणे

Ajit Pawar: अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यास मारहाण

Ajit Pawar: पुण्याचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात तीन पक्षांचे म्हणजेच महायुतीचे सरकार आहे. अजित पवार गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्या सरकारमध्ये अनेकदा कुरूबूरी सुरू असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू असतात. अशातच मात्र, पुणे भाजपचे आमदारीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. तसेच यावेळी त्यांनी ससून रुग्णलयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमावेळी अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह आदि नेते उपस्थित होते.

यावेळी पुण्याचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ससून रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांच्या उपस्थितीत ही घटना घडली आहे.

भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली. यामुळे कार्यक्रमस्थळी सर्वच जण गोंधळले. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली. ससून रुग्णालयात उद्घाटन पाटीवर नाव नसल्याने कांबळे संतप्त झाल्याने त्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT