उजनीच्या पाणीसाठ्यात 15 टक्‍क्‍यांनी वाढ  
पुणे

पुणे : चार धरणात मिळून पाणीसाठ्यात 0.75 TMCची वाढ

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाला चांगली सुरवात झाली आहे. एक जून पासून आज अखेर (१८ दिवसात) टेमघर ३७०, पानशेत २८९ व वरसगावला २८४ तर खडकवासला धरणात १५३ मिलीमीटर पाउस झाला आहे. यामुळे चार ही धरणात मिळून अर्धा टीएमसीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की, आज शनिवारी सकाळी सहा वाजता या चार धरणात मिळून ७.४३ टीएमसी म्हणजे २५.४८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

बुधवारी दि.१६ जून रोजी सकाळी सहा वाजता चार ही धरणात ६.६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. आज शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता ७.२० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. म्हणजे ०.८१०टीएमसीने वाढला आहे. चार ही धरणात फार किरकोळ वाढ झाली आहे.

शुक्रवारी सकाळी सहा ते शनिवार सहा वाजेपर्यंत (२४ तासात) टेमघरला ११०मिलीमीटर पाऊस झाला आहे. वरसगावला ५१, पानशेत५६ तर खडकवासला येथे ४५ मिलिमिटर पाऊस झाला आहे. शुक्रवारी दिवसापेक्षा संध्याकाळनंतर पावसाने अधिक जोर धरला.

शनिवारी सकाळी सहा वाजता चार धरणातील जमा पाणीसाठा :

खडकवासला धरणात १.२३टीएमसी म्हणजे ६२.१७टक्के पाणीसाठा आहे. पानशेत येथे ३.५२टीएमसी म्हणजे ३३.०५टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वरसगावमध्ये २.२६टीएमसी म्हणजे १७.६६टक्के पाणीसाठा आहे. चार ही धरणात मिळून ७.४३टीएमसी म्हणजे २५.४८टक्के एकूण पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर येथे ०.४२ टीएमसी म्हणजे ११.२३ जमा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT