PIFF 
पुणे

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यात होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) कधी होणार याची उत्सुकता पुण्यातील अनेक सिनेरसिकांना लागून राहिली होती. त्यांची ही उत्सुकता संपुष्टात आली असून येत्या ११ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत हा महोत्सव होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता हा महोत्सव आठवडाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.

महोत्सवाचे हे सलग १९ वे वर्ष असून या आधी ४ ते ११ मार्च २०२१ दरम्यान सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार होते. यंदा चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून देखील महोत्सव रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, फक्त तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. याशिवाय राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत ५० टक्के इतक्याच क्षमतेने चित्रपटगृहात महोत्सव होईल.

यावर्षी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि कॅम्प परिसरातील आयनॉक्स या ३ ठिकाणी ७ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार असून www.piffindia.com या संकेतस्थळावर इच्छुकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT