Sports Sakal
पुणे

Pune : ज्यांनी कधी मैदानाच पाहिले नाही, ते लाटतायेत क्रिडा कोट्याचे आरक्षण

बनावट खेळाडूंना रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय हवा असल्याची मागणी अनेकांनी केली आहे.

सम्राट कदम

पुणे : ज्यांनी कधी मैदानाच पाहिले नाही, असे लोक आज क्रिडा कोट्याचे आरक्षण लाटत आहे. दिवसरात्र मेहनत करून राष्ट्रीय स्तरावर मिळविलेली पदकेही या कागदी घोड्यांपुढे निष्फळ ठरत असून, राज्यभरातील खेळाडूंना न्याय देण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी खेळाडू उमेदवारांसह माजी अधिकाऱ्यांनीही केली आहे.

या संबंधी ‘सकाळ’ला आलेल्या निवडक प्रतिक्रिया

आयटी कंपन्यांप्रमाणेच नवनियुक्त कर्मचाऱ्याची पूर्वानुभवाची एका तिसऱ्या तटस्थ संस्थेमार्फत चौकशी करायला हवी. खेळाडू असल्यास शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांच्या नावाची चौकशी करायला हवी. यावरून तो उमेदवार खरेच पात्र आहे किंवा नाही हे सहज समजू शकते. शोधायला गेले तर पर्याय भरपूर आहेत परंतु त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी.

- रोहन शिंदे

राजपत्रित अधिकारी होत असताना बनावट प्रमाणपत्राचा वापर होत असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. क्रिडा विभागासह राज्यशासनाने क्रिडा कोट्यासाठी एक वेगळी पडताळणी परीक्षा घेणे गरजेचे असून, येवू घातलेल्या भरती प्रक्रीया पाहता बनावट खेळाडूंना रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.

- महेश बडे, एमपीएससी समन्वय समिती

खेळाडू कोट्यातील पडताळणीवेळी फक्त एकच प्रमाणपत्र पाहिले जाते. इतर प्रमाणपत्र कोणी विचारतच नाही. तसेच राज्यस्तरावर एका पेक्षा जास्त वेळेस खेळणाऱ्या खेळाडूचाही गट ‘ब’साठी विचार करण्यात यावा.

- प्रज्योत देशमुख, फलटण

राज्यामधील सर्व पदभरत्या पारदर्शक व्हायला हवा. बनावट प्रमाणपत्रामुळे खरे खेळाडू वंचित राहत असून, असे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी कारवाई करावी.

-दीपक राऊत, बुलडाणा

बीड जिल्ह्यात नौकानयन खेळाची प्रमाणपत्र सर्रास भेटतात. ते प्रमाणपत्र घेऊन आजपर्यंत अनेकांनी नोकरीला लागल्या आहेत. चार ते पाच लाखाला राज्यस्तरीय प्रमाणपत्र, १५ लाखाला राष्ट्रीय स्तराचे प्रमाणपत्र या ठिकाणी भेटते. बोगस खेळाडूकडे फक्त एकच प्रमाणपत्र असते. यावर वेळीच आळा नाही घातला, तर खरे खेळाडू खेळापासून दूर होतील. सध्या पोलिस भरती चालू आहे, या भरतीत अनेक खोटी प्रमाणपत्र असलेली उमेदवार आहेत.

- वाचक

गेली १२ वर्ष मी कुस्ती या खेळाचा सराव करत आहे. राज्य राष्ट्रीय स्पर्धेत पदके पटकावली आहेत. पदवीनंतर सरकारी अधिकारी बनण्याची स्वप्न उराशी बाळगून गेली तीन वर्ष मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. या क्षेत्रात आल्यानंतर कळाले की बोगस प्रमाणपत्र असलेले अनेक उमेदवार स्पर्धेत आहेत. काहीजण माझ्या अवतीभोवती पण आहे. कधी मैदानात उतरले नाहीत, खेळाचा माणूस ही नाही. अशी बोगस खेळाडू नोकऱ्या लाटत आहेत. माझ्यासारखे खेळाडू दहा ते बारा वर्ष सराव करून त्यांना हक्काची नोकरी नाही.

- हेमचंद्र सांडूर, कुस्तीपटू, मुक्काम पोस्ट शिवणी (जिल्हा लातूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT