Crime esakal
पुणे

Pune Crime : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या सहा बुकींना अटक

आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन बेटिंग घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाइन बेटिंग घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी छत्तीसगड, पंजाब आणि बिहार राज्यातील सहा बुकींना खराडी परिसरात अटक केली असून, पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

गौरव दयाराम धरमवाणी (वय २७), सुनिश तुलशीदास लखवानी (वय २५), जपजीतसिंग आतमजीतसिंह बग्गा (वय २५, रा. खराडी, मूळ रा. रायपूर, छत्तीसगड), जसप्रीत मनजिंदरसिंग सिंह (वय २९), तरणदीप बलजिंदर सिंह (वय ३३, दोघे रा. शिवाजीनगर, लुधियाना, पंजाब) आणि लालकिशोर दुखी राम (वय ३७, मूळ रा. बीहरौना, दरभंगा, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, डीके नावाचा बुकी फरार आहे. आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधील सदनिकेत क्रिकेट मॅचवर बेटिंग सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी माहितीची खातरजमा केली.

त्यानुसार पोलिसांनी खराडी येथील सोसायटीमधील एका सदनिकेत छापा टाकला. त्यावेळी आरोपी मुंबई इंडियन्सविरुध्द लखनौ सुपर जायंट्स या क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, पोलिस हवालदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, पोलिस अंमलदार संदीप कोळगे, अजय राणे, सागर केकाण, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बॅंक खाती गोठवली

आरोपींकडून १६ मोबाईल हॅन्डसेट, दोन लॅपटॉप, वायफाय राऊटर आणि रोख रक्कम जप्त केली आहे. आरोपींच्या बॅंक खात्यातील सुमारे २० लाखांची रक्कम गोठविण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

SCROLL FOR NEXT