Pune IT engineer who helped people during Corona crisis selected world class award  Sakal
पुणे

Pune : कोरोनाच्या संकटकाळात लोकांना मदत करणा-या आयटी अभियंत्याची जागतिक दर्जाच्या पुरस्कारासाठी निवड...

घरापासून दुर राहुन सामाजिक जाणिवेतून लोकांचे समुपदेशन, सरकारी कोरोना उपचार केंद्रांची माहिती देणे,रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे,कोरोना टेस्टिंग सेंटरवर कोरोनाबद्दल नागरिकांची भीती दूर करण्यासाठी त्यांना धीर देत जनजागृती करणे.

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी - कोरोना महामारीच्या संकट काळात स्वतः च्या कुटुंबापासून दूर राहून जनसामान्यांच्या मदतीसाठी सेवाकार्यास वाहून घेतलेल्या आयटी अभियंता विनोद पाटील यांना जागतिक दर्जाचा इन्सपिरिंग ह्यूमन सेवाकार्यातील सन्मान पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

पिंपळे निलख, पिंपळे सौदागर,सांगवी परिसर व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या कठिण काळात या अभियंत्याने जिवाची पर्वा न करता सेवाकार्यात झोकून काम केले.प्रसंगी स्वतः या आजाराशी लढा दिला.

घरापासून दुर राहुन सामाजिक जाणिवेतून लोकांचे समुपदेशन, सरकारी कोरोना उपचार केंद्रांची माहिती देणे,रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे,कोरोना टेस्टिंग सेंटरवर कोरोनाबद्दल नागरिकांची भीती दूर करण्यासाठी त्यांना धीर देत जनजागृती करणे.

स्व:तच्या कुटुंबापासून दूर राहून जनसामान्यांच्या आधारासाठी सेवाकार्य केले. लॉकडाऊनच्या काळात सांगवी, पिंपळे निलख,पिंपळे सौदागर व परिसरातील मित्र परिवाराला वॉट्स अप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एकत्रित केले.

या कठिण काळात या ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना अन्नपदार्थ,जिवनावश्यक साहित्य गरजूंपर्यंत पोचवले.एकीकडे शहरातील स्मशानभूमी शव दाहीन्यांचा दाह धगधगत होता.आधी दवाखान्यात जागा मिळत नव्हती त्या उलट स्मशानभूमीचीही परिस्थिती होती.अग्नीसंस्कारासाठी सख्खी नाती पुढे येत नव्हती.अशा परिस्थितीत या अभियंत्याने मदतीचा मोर्चा स्मशानभूमीकडे वळविला.

सामाजिक जाणिवेतून एकुण ६४ जणांना अग्नी संस्कार दिले.एक मुठ धान्य भुकेल्या साठी या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर,वाकड,सांगवी ,पिंपळे निलख येथील मोठ्या सोसायट्यांमधून प्रबोधन करत धान्याचे संकलन करून ते गरजू विद्यार्थी, कुटुंबापर्यंत उपलब्ध करून देण्याचे सेवाभावी कामही त्यांनी सुरू केले.

मुळ जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील विनोद पाटील यांना आई वडील पत्नी व मुलीचा या सत्कार्यात पाठींबा राहिला आहे.आंतराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डस् दरवर्षी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना इन्स्पायरिंग ह्यूमन हा जागतिक दर्जाचा पुरस्कार देऊन गौरव करते.

२०२३ या वर्षात संस्थेकडे जगभरातून तीन हजारांहून अधिक नामांकन प्राप्त झालेले आहेत.यातून संस्थेने अंतिम २० जणांची निवड केली आहे. यात पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून या पुरस्कारासाठी आय टी अभियंता विनोद पाटील यांच्या सेवाकार्याची दखल घेत एकमेव निवड झाली आहे.या पुरस्कारामुळे त्यांची आयटी हब मित्र परिवार व पिंपरी चिंचवड शहरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT