Money Sakal
पुणे

Itians PF : आयटीयन्सचा ‘पीएफ’साठी लढा

कल्याणीनगरमध्ये कार्यालय असलेल्या एका बड्या आयटी कंपनीने त्यांच्या ४०० कर्मचाऱ्यांचा पीएफ भरला नसल्याचे उघड झाले.

सकाळ वृत्तसेवा

कल्याणीनगरमध्ये कार्यालय असलेल्या एका बड्या आयटी कंपनीने त्यांच्या ४०० कर्मचाऱ्यांचा पीएफ भरला नसल्याचे उघड झाले.

पुणे - परदेशातील प्रोजेक्ट कमी झाल्याने कॉस्ट कटींगच्या नावाखाली नोकरी जाण्याची भीती, परदेशात जाण्याच्या घटलेल्या संधी, मनाप्रमाणे न झालेली पगारवाढ या व अशा अनेक समस्यांचा सामना करीत असलेल्या अनेक आयटीयन्सला आता त्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठीही (ईपीएफ) लढा द्यावा लागत आहे. येथील काही कंपन्यांनी अनेक आयटीयन्सचे पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यातून वजा केले. मात्र, ती रक्कम व कंपनीचा हिस्सा पीएफ खात्यात भरलाच नसल्याचे प्रकार पुढे आले आहेत.

कल्याणीनगरमध्ये कार्यालय असलेल्या एका बड्या आयटी कंपनीने त्यांच्या ४०० कर्मचाऱ्यांचा पीएफ भरला नसल्याचे उघड झाले. त्यामुळे या कंपनीविरोधात तेथील आयटीयन्स आणि काही कामगार संघटनांनी कामगार विभागात दाद मागितली आहे. त्यानुसार विभागाने याबाबत संयुक्त बैठकही आयोजित केली आहे. विशेष म्हणजे भारतासह परदेशातील कंपन्यांनीही पीएफची रक्कम जमा केलेली नाही.

कर्मचाऱ्याच्या बाजूचे पीएफचे पैसे पीएफ खात्यात जमा करण्यात आले, मात्र कंपनीने त्यांचा हिस्सा जमा केला नाही. किंवा दोन्ही बाजूचा पीएफ कंपनीने जमा न केल्याचे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. त्याच फटका अनेक कर्मचाऱ्यांना बसत आहे.

पीएफ न भरणाऱ्या कंपनीवर होतो गुन्हा दाखल

कंपनीने कर्मचाऱ्याचा पीएफ भरला नाही तर ईपीएफ आणि एमपी कायदा, १९५२ च्या कलम १४ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. १४ ए ए शिक्षा, १४ ए बी हा गुन्हा दखलपात्र आहे. तर १४ ए सी गुन्ह्यांची दखल आणि चाचणी करते.

अशी मागा दाद

  • पीएफ न देणाऱ्या कंपनीविरोधात कर्मचारी पीएफ कार्यालयात तक्रार करू शकतो

  • पीएफ आयुक्तांना दखल घेत योग्य ती कारवार्इ करावी लागते

  • पोलिसांत तक्रार दाखल करता येते

  • कंपनीने व्याजासह पीएफ देण्याची तरतूद

एझ्युया या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारातून टीडीएस कपात केला. मात्र, तो प्राप्तिकर विभागाकडे जमा केला नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेला भविष्य निर्वाह निधीचा वापरही कंपनीने चुकीच्या पद्धतीने केला. कंपनीने काही कामगार कायद्यांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आम्ही याबाबत प्राप्तिकर विभाग, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ) आणि राज्याच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार प्राप्तिकर विभागाने हे प्रकरण आयकर महासंचालक पुणे यांच्याकडे पाठवले आहे.

- हरप्रीत सलुजा, अध्यक्ष, नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने घेतला गळफास

Ranji Trophy: जैस्वालचे अर्धशतक, मुशीर खानही लढला; पण मुंबईचा संघ पहिल्याच दिवशी गडगडला

Georai News : फार्मर आयडी नसल्याने अडकले गेवराईतील सोळा हजार शेतक-यांचे अतिवृष्टीचे अनुदान; सवा लाख शेतक-यांचे झाले होते नुकसान

Georai Crime : धुमेगाव शिवारात दोनशे किलोची गांजाची झाडे जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

SCROLL FOR NEXT