Jitendra Awhad  esakal
पुणे

Pune : दोन वर्षांच्या ट्विटवरून गडचिरोली पोलिसांकडून पुण्यातील तरुणाला अटक, जितेंद्र आव्हाडांकडून कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची टीका

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथील शुभम चव्हाण या तरुणाला सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चतु:शृंगी पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करून गडचिरोली पोलिस चव्हाण याला गडचिरोलीला घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शुभम चव्हाण याच्याविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बेकायदेशीर चिथावणीखोर वक्तव्य आणि सोशल मीडियावर अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली.

दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून गडचिरोली पोलिसांच्या कार्यवाहीबाबत टीका केली आहे. "शुभम चव्व्हाण याला गडचिरोली पोलिस त्याच्या घरातून उचलून घेऊन गेले. तुमच्या मुलाने दोन वर्षांपर्वी जे ट्विट केले, त्याच्या तपास कामासाठी आम्हाला त्याला गडचिरोलीला घेऊन जायचे आहे, असे त्याच्या आई-वडिलांना सांगितले.

पोलिस हे साध्या वेशात होते. जबरदस्तीने ते त्याला गडचिरोलीला घेऊन चालले होते. पण त्याच्या बहिणीने ती गाडी अडवली. चतु:शृंगी पोलिस ठाण्यात आणून तेथे त्याची चौकशी केली. त्याने काय ट्विट केले आहे, हे मी स्वतः विचारले असता पोलिसांना ट्विट काय आहे, ते सांगताच येत नाही. हे महाराष्ट्रात नवीन काय सुरु झालं आहे. दोन वर्षांपर्वी केलेल्या ट्विटचा तपास आता करीत आहेत. मग आमच्या सगळ्यांविरुद्ध केलेल्या ट्विटचा तपास कधी सुरु होणार? आमच्याविरुद्ध केलेले ट्विट हे व्यक्ती स्वातंत्र्य आहेत आणि त्यांच्याविरुद्ध केलेले ट्विट हे कायद्याचा भंग आहे. त्याच्या आईने मला ही सगळी कहाणी सांगितली. मी पोलिसांना ट्विट विचारले असता, ट्विट पोलिसांना माहीत नाही, असे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष द्यावे."

या संदर्भात चतु:शृंगी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, "गडचिरोली पोलीस चव्हाण याला घेऊन बुधवारी सकाळी दहा वाजता पोलिस ठाण्यात आले होते. चव्हाण याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात दाखल एफआयआरची प्रत पोलिसांना दाखवून ते त्याला गडचिरोलीला घेऊन गेले. हा गडचिरोली पोलिसांच्या गोपनीय तपासाचा भाग असल्यामुळे याबाबत अधिक माहिती देता येणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT