Diksha Vikas Parve_Junnar girl 
पुणे

बैल उधळला पण 'ती' वेसन धरुन जागेवरच होती उभी; अमोल कोल्हेंनीही केलं कौतुक

घाटामध्ये शर्यतीदरम्यान उधळणाऱ्या बैलावर नियंत्रण मिळवतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील दिक्षा पारवे (Diksha Parve) या तरुणीनं शर्यतीदरम्यान बैलगाडा जुंपतानाचा (Bullock Cart race) व्हिडिओ व्हायरलं झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी दिक्षाच्या या धाडसाचं कौतुक केलं आहे. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील तिला थेट फोन लावत तिच्या या हिंमतीचं कौतूक केलं आहे. यावर कोल्हे यांनी एक फेसबूक पोस्टही लिहिली आहे. (Pune Junnar Diksha Vikas Parve to harness a bullock cart Amol Kolhe also praised his daring)

दिक्षा पारवेचं कौतुक करताना आपल्या फेसबूक पोस्टमध्ये अमोल कोल्हे म्हणातात, "आपल्या जुन्नर तालुक्याची कन्या कु. दिक्षा विकास पारवे हिने बैलगाडा जुंपण्याची हिंमत दाखवली! त्याबद्दल तिचे फोन करून कौतुक केलं तसेच हे धाडस करताना काळजी घेण्याची व अभ्यासाकडे दुर्लक्ष न करण्याची विनंतीही केली"

दिक्षा विकास पारवे ही इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी असून बैलगाडा शर्यतीच्या उंचखडक घाटात बैलगाडा जुंपतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिचे वडील विकास पारवे हे बैलगाडा मालक आहेत. त्यांच्या बैलाचं नाव विज्या असून गेल्या तीन वर्षांपासून पारवे कुटुंबिय या बैलाची काळजी घेत आहेत, अशी माहिती दिक्षानं कोल्हेंशी बोलताना दिली. गेल्या पाच वर्षांपासून बैलगाडा जुंपण्याचं काम ती करते. यावर काळजीचा सल्ला देताना कोल्हे यांनी तिला सर्व नियमांचे पालन करुन बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं तसेच दहावीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्लाही दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

"म्हणून वेगळ्या भूमिका साकारण्याकडे कल" प्रियाने स्पष्ट केलं हटके भूमिका साकारण्यामागचं खरं कारण !

आई, बहीण अन् भाच्याचा गळा चिरला, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न; चिटफंडच्या कर्जाचा डोंगर अन् बहिणीच्या आजारपणामुळे टोकाचा निर्णय

Manchar Tax Dues: मंचर नगरपंचायतीची ४.८४ कोटींची कर थकबाकी; घरपट्टी–पाणीपट्टी न भरल्यास जप्ती व लिलावाची कारवाई

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT