Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar  Esakal
पुणे

Kasba Bypoll Election : रवींद्र धंगेकर यांचं 5 तासानंतर उपोषण मागे

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी प्रचार संपल्यानंतरही थांबायला तयार नाहीत. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, त्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रवींद्र धंगेकर हे आज सकाळी कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले होते. संबधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी हे उपोषण मागे घेतलं आहे.

भाजपचे नेते आणि पदाधिकारी हे पोलिसांच्या उपस्थितीत कसब्यातील मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले होते. धंगेकरांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती.

तर रविंद्र धंगेकर यांच्या आरोपवर जगदीश मुळीक यांनी उत्तर देताना म्हंटलं होतं की, हा कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे, हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, असे खोटे आरोप भाजपच्या उमेदवारावर करुन फक्त सहानुभूती निर्माण करण्याचं काम ते करत असल्याची प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली होती.

त्यानंतर यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे उपोषण करून पॉलिटिकल स्टंट असल्याचंही फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या आरोपवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्पष्टपणे दिसून येत आहे की, आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही हे माहिती असताना अशा प्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पायाखालून जेव्हा वाळू निघून जाते त्यावेळी असे स्टंट केले जातात. हे आचार संहितेचे उल्लंघन आहे."

पुढे फडणवीस म्हणाले की, "पैसे वाटणे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संस्कृति आहे. पैसे वाटणे ही भाजपची संस्कृति नाही. आमचा मतदारही असा नाही. जो पैसे घेऊन मतदान करेल. मतदारांचा अवमान करण्याचे काम आहे. धंगेकर यांचं हे उपोषण भाजपविरुद्ध नाही तर हे उपोषण मतदारांच्या विरुद्ध आहे कारण ते मतदारांना बिकावू ठरवत आहेत. हे अतिशय चुकीच आहे. देव त्यांना सुबूदधी देवो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT