Pune Katraj Dairy One day sale four tons ice cream and five tons curd sakal
पुणे

पुणे : चार टन आईस्क्रीम तर पाच टन दह्याची विक्री

कात्रज डेअरीची एका दिवसाची विक्री; ९० हजार पिशव्या ताकही होते फस्त

अशोक गव्हाणे

कात्रज : मे महिन्यात शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून दूधापासून तयार करण्यात येणाऱ्या थंड पेयांना चांगलीच मागणी वाढली आहे. तुलनेने दही, ताक, लस्सी, आम्रखंड, श्रीखंड, सुगंधी दूध, पनीरच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरीकडून उत्पादित होत असलेल्या चार टन आईस्क्रीम आणि पाच टन दह्याची दररोज विक्री होत आहे. तर दिवसाला ३६ लिटर म्हणजेच ९० हजार पिशाव्या ताक पुणेकर फस्त करत आहेत. त्याचबरोबर, मोठ्या प्रमाणांत सॉफ्टी आईस्क्रीमचीही विक्री होत असते.

मागील दोन वर्षात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे विक्रीत काही प्रमाणांत घट झाली होती. पंरतु, यावर्षी ही विक्री मोठ्या प्रमाणांत वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा वाढला. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली. परिणामी, ग्राहकांकडून दुधाच्या तुलनेत थंड दूग्धजन्य पदार्थांच्या मागणी मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आईस्क्रीममध्ये बटरस्कॉच, मँगो, पेरु, व्हॅनिला असे विविध प्रकार आणि लस्सीमधील मँगो लस्सी अशा प्रकारची कात्रज डेअरीची विविध उत्पादने ग्राहकांच्या चांगलीच पसंतीला उतरत आहेत. त्यामुळे कात्रजमधील डेअरीच्या तिन्ही पार्लरवर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र कायम दिसून येते.

थंड पदार्थांची कात्रज डेअरीची रोजची विक्री

  • दही- ४ टन

  • आईस्क्रीम - ५ टन

  • साधे ताक - ६० हजार पिशव्या (३० हजार लिटर)

  • जिरा ताक- ३० हजार पिशव्या (६ हजार लिटर)

  • लस्सी - १२ हजार पॅकेट

  • पनीर ५०० किलो

  • श्रीखंड - ६०० किलो

  • आम्रखंड - ५०० किलो

  • सुगंधी दूध - ७५०० पिशव्या (१५०० लिटर)

प्रतिक्रिया

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका बसला होता. मात्र, यंदा कोरोनाचे नियम नसल्याने ग्राहक वाढल्याचे दिसून येत आहे. ग्राहकही थेट पार्लरवर येऊन खरेदी करण्यांवर भर देत असून शितपेयाची विक्री मोठ्या प्रमाणांत वाढली आहे. शितपेयांसोबत अन्य पदार्थांच्या विक्रीतही वाढ झाली आहे.

- केशर पवार, अध्यक्ष, कात्रज डेअरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT