pune kolhapur diwali esakal
पुणे

Pune: दिवाळीत पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार, नोकरदारांना दिलासा

CD

पुणे, ता. २७ ः रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीनुसार दिवाळीत पुणे-कोल्हापूर-पुणे अशी विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ही रेल्वे धावेल. दिवाळीत ही रेल्वे सुरू होत असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

रेल्वे प्रशासन कोल्हापूर -पुणे दरम्यान सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. तत्पूर्वीच रेल्वे प्रशासन दिवाळीच्या काळात पुणे-कोल्हापूर-पुणे अशी विशेष रेल्वे सुरू करीत आहे. या गाडीला १६ डबे असतील. यासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसचा रेक वापरण्यात येणार आहे.

५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान या गाडीच्या ११४ फेऱ्या होणार आहेत. पुणे- कोल्हापूर ही गाडी पुण्यातून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. कोल्हापूरला सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. कोल्हापूरहून ही गाडी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ती गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी पुण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: ऑनलाइन अ‍ॅपवर ६२ वर्षीय महिलेनं मसाजसेवा बूक केली, घरात मसाजवेळी झोप लागताच...; ठाण्यात धक्कादायक प्रकार

Pimpri Accident: पिंपरीतील अपघातात बहीण-भावाचा मृत्यू; दुःखातही मुल्या कुटुंबीयांचा अवयवदानाचा निर्णय, कुटुंबीयांनी जपली माणुसकी..

Encroachment: अंत्यसंस्कारांनाही जागा नाही; स्मशानभूमीवर अतिक्रमणाचा विळखा!

Latest Marathi News Live Update : सोयाबीनच्या दरात तब्बल ३०० रुपयांची घसरण; एकाच दिवसात ४० लाखांचे नुकसान!

Farmer Success Story: हळदीला क्विंटलला ३० हजारांचा दर; आष्ट्यातील भगवान बोते यांचे तीन एकरांत १०५ क्विंटल उत्पादन

SCROLL FOR NEXT