In Pune the Labor Department provided food and food grains to over 1200 complainants 
पुणे

पुण्यात जेवण व अन्नधान्य नसल्याच्या शे- दोनशे नव्हे तब्बल १२०० तक्रारी

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊन काळात घरातील अन्नधान्य संपले आहे. स्थलांतरित असल्याने जेवण मिळत नाही, अशा तब्बल एक हजार 165 तक्रारी अपर कामगार आयुक्त कार्यालयात आतापर्यत दाखल झाल्या आहेत. तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधितांना पोटभर जेवण मिळेल सोय देखील त्वरित करण्यात आली आहे.

पुण्यातील "या' भागात १० दिवस असणार कडक बंद 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मजूर वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्था कार्यरत आहे. तर कामगार विभागाकडून मजुरांची सोय करण्यात येत आहे. 
आमच्याकडे आत्तापर्यत एकूण एक हजार 289 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील काही तक्रारी या संघटित स्वरूपाच्या असून तक्रार करणारे एकूण 38 हजार 771 नागरिक आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
तक्रार करणारे केवळ कामगारच नाही तर छोटे-मोठे व्यवसाय करणारे देखील आहेत. नाक्यावर वस्तू विकणाऱ्यांचा देखील यात समावेश आहे.   तक्रार आमच्याकडे येताच त्यांना जेवण आणि किराणा कसा मिळेल याबाबत त्वरित नियोजन करण्यात येते. संबंधितांच्या समस्या सोडवण्यात आले आहेत. या सर्वांना सरकारी यंत्रणा, सामाजिक, संस्था, बांधकाम व्यावसायिक आणि विविध कामगार संघटना यांच्या माध्यमांतून जेवण व राशन उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती  कामगार उप आयुक्त विकास पनवेलकर यांनी दिली. 

 पुणेकरांनो सावधान, या भागात वावरतोय बिबट्या
सामाजिक संस्था, कामगारांच्या संघटना, कामगारांच्या समस्या समजून घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी यांच्यामार्फत या तक्रारी कामगार विभागाला मिळाल्या आहेत. 

कोरोनाच्या निदानासाठी होणार कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर, पण कसा? वाचा सविस्तर

आम्हाला गावी जायचे आहे : 
शहरात अडकून पडलेल्या कामगारांना गावी जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे आमची गावी जाण्याची सोय करण्यात यावी, याबाबतच्या 55 तक्रारी आल्या होत्या. संबंधितांचे म्हणणे योग्य यंत्रणेकडे पाठवून त्यांची अडचण दूर करण्यात आली आहे, असे पनवेलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT