Ringroad
Ringroad 
पुणे

पुणे : रिंगरोडसाठी जमीन मोजणीला होणार प्रारंभ

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास (एमएसआरडीसी) महामंडळाच्या पहिल्या टप्प्यातील पश्चिम चक्राकार मार्गाच्या (रिंगरोड) भूसंपादनासाठी २५ मार्चपासून मोजणी सुरू करण्यात येणार आहे. ही मोजणी प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच, पूर्व भागातील रिंगरोडच्या मोजणीसाठीही अधिसूचना शासन स्तरावर असून, पूर्व आणि पश्चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यातील पश्चिम रिंगरोडच्या भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रियेबाबत मंगळवारी (ता. २३) आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्य महामार्गासाठी जमिनीच्या भूसंपादनाच्या अधिसूचनाही राज्य सरकारने जारी केली आहे. या रिंगरोडच्या मोजणी आणि भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले. डॉ. पुलकुंडवार यांनी प्रकल्पाची माहिती, प्रक्रियेत विविध विभागांची जबाबदारी व समन्वय, प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया, संयुक्त मोजणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही टप्प्यांतील रिंगरोडसाठी येत्या डिसेंबरपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

पश्चिम रिंगरोडची मोजणी सुरू करण्यापूर्वी संबंधित गावातील नागरिकांसोबत बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाची माहिती दिली जाईल. नागरिकांच्या शंकाचे निरसन करून भूसंपादन आणि मोजणी प्रक्रियेला गती मिळेल. संपादित करण्यात येणाऱ्या जागेचे मूल्यांकन करण्यासाठी मोजणीवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने उपस्थित राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT