Electric Meter Reading
Electric Meter Reading Sakal
पुणे

स्वतः मीटर रीडिंग पाठविण्यात पुणे आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्वतः मीटर रीडिंग (Meter Reading) पाठविण्यास वीज ग्राहकांकडून (Customer) प्रतिसाद(Response) वाढला आहे. एप्रिल महिन्यात २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी मोबाईल अॅप, वेबसाइट व ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग महावितरणकडे (Mahavitan) पाठविले आहे. यामध्ये पुणे परिमंडलातील सर्वाधिक ४९ हजार ९५० वीज ग्राहकांचा समावेश आहे. (Pune leads in sending meter readings)

महावितरणने वीजग्राहकांना स्वतः मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ते पाठविण्याची मुदत चार दिवस करण्यात आली आहे. मार्च महिन्यात १ लाख ३५ हजार २६१ ग्राहकांनी रीडिंग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिल महिन्यात ६७ हजार ४८१ संख्येने वाढ झाली आहे.

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज जोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रीडिंगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवस आधी रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येते आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अॅप, www.mahadiscom.in या संकेतस्थळावर किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्ल्यूएच (kWh) रीडिंग पाठविता येते.

असे पाठवा मीटर रीडिंग

महावितरणच्या मोबाईल अॅपमध्ये ‘सबमीट मीटर रीडिंग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्ल्यूएच (kWh) रीडिंगचा (केडब्ल्यू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमीट करावा. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगिन करून www.mahadiscom.in वेबसाइटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करावा. ‘एसएमएस’द्वारे रीडिंग पाठविण्यासाठी MREAD<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रीडिंग 8 अंकापर्यंत> असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT