Pune
Pune Sakal
पुणे

Pune : माधव नगर परिसरात बिबट्याची दहशत; 'मात्र पिंजरा लावण्यास टाळाटाळ'..!

संतोष काळे

राहू - नजीक माधवनगर येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास राजेंद्र ज्ञानोबा कुल यांच्या गोठ्यात बांधलेलया कालवडीचा बिबट्याने फडशा पाडला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात तातडीने बिबट्याला बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा. अशी मागणी संजय कुल यांच्यासह नागरिकांकडून होत आहे.

परिसरात आठ दिवसांपासून बिबट्याचा  मोठया प्रमाणात वावर वाढल्याने मोठी दहशत आहे. दोन दिवसापूर्वी येथील दोन पाळीव कुत्र्यांचाही बिबट्याने फरशा पडला होता. दरम्यान बॅटरी आणि दुचाकी गाडीच्या उजेडामुळे त्याने उसाच्या शेताकडे धूम ठोकली. अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करत फस्त केले. शेतात काम करत असताना शेतमजुरांना अचानक  बिबट्या दिसत आहे.

अनेक ठिकाणी बिबट्यांच्या पायांचे ठसे देखील नागरिकांना आढळून आले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली .पंचनामा करून केला पुढील कारवाईसाठी वरिष्ठ विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीने त्वरित कागदपत्रांची आमच्या वरिष्ठ कार्यालयाला पूर्तता करावी . परिसरात तातडीने पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला कळवले जाईल. असे आश्वासन वन विभागाच्या वतीने ग्रामस्थांना दिले.

नागरिकांनी सतर्क राहावे. रात्री अपरात्री शेतात न जाण्याचा सल्ला दिला. घरा भोवताली विजेचे दिवे चालू ठेवा. अधून-मधून फटाके वाजवा. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये. असे आवाहन वन विभागाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले आहे. राहू बेट परिसरात दोन वर्षांपूर्वी चार बिबट्यांना जेर बंद करण्यात वन विभागाला यश आले होते.

सोनवणे डेअरी फार्म नजीक प्रशांत शिंदे आणि मनोज शिंदे यांच्या शेतामध्ये बिबट्याचे ठसे आढळून आले. परिसरात एक मादी आणि तीन बछडे येथील नागरिकांना वावरताना दिसून आले. वन विभागाला यासंदर्भात कळून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. :

बिबट्याचे भर दिवसाही दर्शन, मात्र पिंजरा लावण्यास टाळाटाळ..!

राहू परिसरात बिबट्याचा वावर आहे. वन विभागाला अनेकदा कळूनही पिंजरा लावण्यास सोयीस्कर टाळाटाळ केली जात आहे. असे येथील काही जागृत नागरिकांचे म्हणणे आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast: डोंबिवली हादरली! MIDC मध्ये मोठा स्फोट, अनेक जखमी; परिसरात धुराचे लोट Video Viral

Dombivli MIDC Blast Live Update: डोंबिवलीमध्ये अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल 

High Court News: मुलगा चांगल्या कुटुंबातील, मुलीचा विनयभंग करणाऱ्याला उच्च न्यायालयाने केला 'या' एका अटीवर जामीन मंजूर

Ambati Rayudu RCB : सीएसके आरसीबीला त्यांची एक ट्रॉफी देऊ शकते जेणेकरून ते... रायुडू असं का म्हणाला?

Madhuri Dixit: धकधक गर्ल माधुरीच्या लांब अन् दाट केसांचे रहस्य,'हे' खास पद्धतीचं तेल लावताच केसगळती थांबेल

SCROLL FOR NEXT