लिक्वीड पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा Sakal
पुणे

लिक्वीड पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा

२३ वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेला फरशी पुसण्याचे लिक्वीड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हांडेवाडी रोडवरील किंगस्टन सिरीन या सोसायटीत १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला होता. (Pune Crime News)

याप्रकरणी हडपसर- सय्यदनगर येथे राहणार्‍या एका २३ वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती रेहान काझी, सासू नजमा काझी, नंणद गजाला काझी व हिना शेख यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पती, सासू, नंणदसह हांडेवाडी येथे रहात होत्या. रेहान काझी याने फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी तो व त्याचे घरचे फिर्यादी यांनी माहेरहून २ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करुन तिचा छळ करीत होते. तिने माहेरहून पैसे न आणल्याने त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सर्वांनी मिळून सवेरा कंपनीचे फरशी साफ करण्याचे लिक्वीड फिर्यादी यांना जबरदस्तीने पाजून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तिने उपचार घेतल्यानंतर आता कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT