pramod sawant sakal
पुणे

Pune : स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वयंपूर्ण गोव्यासाठी कार्य करावे

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन, एमआयटीच्या वतीने ‘राष्ट्रीय पंचायत संसदे’चे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी मानवाच्या प्रगतीचे सूत्र लक्षात ठेऊन स्वयंपूर्ण गोव्यासाठी कार्य करावे. किसान क्रेडिट कार्ड योजनेसोबतच अटल ग्राम आणि आदर्श ग्राम योजनांवर कार्य करण्यासाठी सर्व सरपंचांच्या सहकार्याची गरज आहे,’ असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

गोवा विधानसभा, गोवा सरकार आणि एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हन्मेंट, पुणे यांच्यावतीने दोना पावला येथे आयोजित ‘राष्ट्रीय पंचायत संसदे’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवलेकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर, ग्रामविकास मंत्री मिलिंद नाईक, जेनिफर मॉनसेरटी, आमदार प्रतापसिंग राणे, मंत्री दीपक पावसकर, क्लासिओ डिसेस, आमदार वेल्फेड डिसोझा, विनोद पालेकर, कार्तिक कुंदणकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, एंजेल फर्नांडिस, मॅच्युले रिबॅनो आणि सुवर्णा तेंडुलकर या वेळी उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे कराड यांनी डॉ. सावंत आणि पाटणेकर यांचा विशेष सत्कार करून मानपत्र व स्मृतिचिन्ह दिले.

डॉ. सावंत म्हणाले, ‘गोव्यातील सरपंचांनी कोरोना आणि पूरग्रस्तांच्या काळात केलेले कार्य अभिमानास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या व्होकल फॉर लोकल, स्कील इंडिया अंतर्गत गोव्याचा स्वयंपूर्ण विकासाचे भागीदार सर्वांना बनवायचे आहे. स्वच्छ भारत योजनेत प्रत्येक नागरिकांना सहभागी व्हावे. हे सरकार कोणत्याही एका पक्षाचे नाही तर गोवावासियांचे आहे. एमआयटीच्या वतीने आयोजित ही राष्ट्रीय सरपंच परिषद महत्त्वपूर्ण आहे.’

कराड म्हणाले, ‘यापूर्वी आम्ही देशातील वेगवेगळ्या राज्यात या प्रकारच्या संसदेचे आयोजन केले. गोव्यातील या आयोजनाने नवा इतिहास रचला आहे. येथील सरपंचांनी केलेले कार्य समाजातील लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न या संसदेतून केला जाणार आहे.’ डॉ. गौतम बापट आणि सुभाष जान यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : ब्रह्मपुरी, वर्ध्याचा पारा ४७ अंशांवर; विदर्भात आणखी दोन दिवस रेड अलर्ट, पावसाचं आगमन कधी होणार?

Eye Care Tips : स्क्रीन बघताच डोळे दुखू लागतात? मोबाईल अन् लॅपटॉपमध्ये लपलेल्या 'या' 2 सेटिंग करा सुरू; मिनिटात मिळेल आराम

Vinesh Phogat: खेळाडूंविरुद्ध सूडबुद्धीने वागू नका...!" हायकोर्टाने कुस्ती संघटनेला झापले; विनेश फोगाट प्रकरणात मोठा ट्विस्ट

पुण्यात ‘रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल’चा दिमाखदार शुभारंभ!

BJP MLA: "वर्गात 'येस सर' ऐवजी 'जय श्री राम' म्हणा..." ; भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे वाद!

SCROLL FOR NEXT