Market Yard Pune esakal
पुणे

Market Yard Pune: डमी अडत्याकडून शेतकऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण; पुणे बाजार समितीतील प्रकार, नेमकं काय घडलं?

Market Yard Pune:  नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील शेतकरी आदिनाथ गायकवाड यांनी शुक्रवारी एका अडत्याकडे १०८ क्रेट संत्री विक्रीस आणली होती. त्या शेतकर्‍याकडे संत्रीसह मोसंबीचीही बाग आहे.

प्रवीण डोके @pravindoke007

Market Yard Pune: 

मार्केट यार्ड: पुणे बाजार समितीच्या फळविभागात शेतकर्‍याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. डमी अडत्या (चवली दलाल) मोसंबीला कमी भाव देतात असे सांगितल्याने शेतकर्‍याला एका डमी अडत्याने मारहाण केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी पाठवायचा का नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील शेतकरी आदिनाथ गायकवाड यांनी शुक्रवारी एका अडत्याकडे १०८ क्रेट संत्री विक्रीस आणली होती. त्या शेतकर्‍याकडे संत्रीसह मोसंबीचीही बाग आहे. मोसंबीदेखील बाजारात विक्रीस आणायची होती. त्यामुळे मोसंबीला किती भाव मिळत आहे, याची चौकशी करायला गायकवाड एका अडत्याच्या गाळ्यावर गेले होते. तेथे ते चर्चा करत असताना त्यांच्या पाठीमागे एक डमी अडत्या उभा होता. चर्चेवेळी शेतकरी गायकवाड यांनी डमीकडे मोसंबीला भाव कमी मिळतो असे सांगितले. डमी आडत्या सुरेश याने ते ऐकल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने शेतकर्‍याला लाथा, कानशिलात मारल्या आहेत. (pune Market Yard)

त्यानंतर शेतकरी गाकवाड हे घाबरले होते. रविवारी बाजारात आल्यानंतर त्यांनी ही घडलेली घटना पत्रकारांसह अडते असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांच्या कानावर घातली. मात्र, बाजारात शेतमाल विक्रीस पाठवायचा असल्याने पुढे अडचणी नको म्हणून तक्रार करण्यास शेतकरी घाबरला. बाजार समितीने मात्र याची काहीह दखल घेतलेली नाही.

याबाबत नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील शेतकरी आदिनाथ गायकवाड म्हणाले, गेल्या तीस वर्षांपासून मी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीस पाठवित आहे. मोसंबीचा भावाची चौकशी करताना आडत्यांना डमी अडत्याकडे शेतमालास कमी भाव मिळतो हे सांगितले. तेवढे ऐकून डमी अडत्याने मला लाथा मारल्या आणि कानशिलात लगाविली. (pune news)

हा प्रकार दोन-तीन दिवसांपुर्वी घडला आहे. संबंधित शेतकर्‍याने या प्रकाराबाबत तक्रार केलेली नाही. मात्र, विभाग प्रमुख यांना या प्रकाराची चौकशी करायला सांगितली आहे. तसेच, संबंधित डमी अडत्याला मार्केटमध्ये प्रवेश बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- डॉ.राजाराम धोंडकर,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT