Pune-Airport 
पुणे

लोहगाव विमानतळ महिनाभर राहणार रात्री बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे - धावपट्टी दुरुस्ती करायची असल्यामुळे लोहगाव विमानतळावर २६ ऑक्‍टोबरपासून महिनाभर फक्त दिवसाच उड्डाणे होणार आहेत. रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान कोणतीही उड्डाणे होणार नाहीत. त्यामुळे विमानतळ रात्री बंद राहणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्तीची कामे प्रलंबित होती. त्याला आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे २६ ऑक्‍टोबरपासून २६ नोव्हेंबरपर्यंत विमाने सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान उड्डाणे करतील. त्यातच हवाई दलाच्या विमानांचा सराव सकाळी किमान दोन तास होतो. त्यामुळे पहिल्या दोन तासांत नागरी उड्डाणांची संख्या कमी होण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्याने वर्तविला. त्यामुळे नागरी विमानांसाठी लोहगाव विमानतळ १० तासच उपलब्ध राहण्याची चिन्हे आहेत. मात्र या बाबतचा अधिकृत निर्णय झालेला नाही. विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग याबाबत निर्णय जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले.

तिकीटदर वाढीची शक्‍यता
विमानतळ बंद राहणार असल्यामुळे विमान कंपन्यांनी पुण्यातून होणारी आणि पुण्यात येणाऱ्या उड्डाणांच्या वेळापत्रकाची फेररचना करण्यास सुरुवात केली आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुट्यांमुळे प्रवाशांची गर्दी वाढते. यावेळी विमानांच्या उड्डाणांची संख्या मर्यादित राहणार असल्यामुळे पुणे मार्गावरील विमानांच्या तिकिटांच्या दरांत वाढ होऊ शकते, अशी शक्‍यता विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. 

सध्या ६० विमानांची उड्डाणे
लॉकडाउनमुळे विमानसेवा २५ मार्चपासून पुण्यातून बंद होती. २५ मे पासून ती सुरू झाली आहे. दिल्ली, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकता, जयपूर, प्रयागराज, नागपूर आदी १४ शहरांसाठी पुण्यातून विमान वाहतूक सुरू आहे. सध्या दररोज कमाल ६० विमानांची उड्डाणे होत असून ९ ते १० हजार प्रवाशांची रोज ये-जा होते.

विमानतळावर पहिला अधिकार हवाई दलाचाच ! 
हवाई वाहतूक विश्‍लेषक धैर्यशील वंडेकर म्हणाले, ‘‘लोहगाव विमानतळ हा हवाई दलाचा तळ आहे. तो नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे विमानतळावर पहिला अधिकार हवाई दलाचा आहे. त्यांच्या सरावाला प्राधान्य द्यावे लागेल. परिणामी, नागरी विमानांच्या फेऱ्यांची संख्या कमी करावी लागेल. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने जास्त मार्गांवर कनेक्‍टिव्हिटी राहील, यासाठी नियोजन करावे.’’

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

Asian Games : भारतीय क्रिकेटपटूच्या घराबाहेर पोहोचली तरुणी; खेळाडू श्रेयससोबत जपानमध्ये, तिचा इथे ड्रामा, नेमकं काय घडलं?

पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT