Pune sakal
पुणे

Pune : लोणी धामणी परिसराला जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला सुद्धा आनंद मिळणार नाही; दिलीप वळसे पाटील

महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हाळसाकांत उपसा सिंचन योजना कुकडी प्रकल्पात समावेश करण्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी देऊन सर्वेक्षणाच्या कामास मान्यता दिली होती सर्वेक्षण झाले त्या प्रमाणे जर ही योजना झाली.

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

Pune - आंबेगाव तालुक्यांतील सर्वच भाग बागायती झाला असताना फक्त लोणी धामणीचा परिसर हा पाण्यापासुन वंचित राहिलेला आहे जोपर्यंत या परिसराला पाणी मिळणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला सुद्धा आनंद मिळणार नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हाळसाकांत उपसा सिंचन योजना कुकडी प्रकल्पात समावेश करण्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी देऊन सर्वेक्षणाच्या कामास मान्यता दिली होती सर्वेक्षण झाले त्या प्रमाणे जर ही योजना झाली.

तर या परिसरातील 2700 हेक्टर जमीन पाण्याखाली येईल या योजनेसाठी सुमारे 138 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या योजनेच्या पुर्ततेसाठी शासनाकडे प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

लोणी ता. आंबेगाव येथील सव्वा अकरा कोटी रुपये खर्चाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसह एकूण सुमारे १९ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,

भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक शिवाजीराव ढोबळे, बाबासाहेब खालकर, अंकित जाधव, रामदास वळसे पाटील, अनिल वाळुंज, दौलत लोखंडे, निलेश थोरात,

सरपंच ऊर्मिला धुमाळ, उपसरपंच अनिल पंचरास, बाळासाहेब वाळुंज, भगवान सिनलकर, महेंद्र वाळूंज, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, अजय आवटे, संजय गवारी, सचिन भोर, अशोक आदक पाटील, चंद्रकांत गायकवाड, उत्तम आदक, जयश्री रोकडे, पांडुरंग दिवटे, बाळासाहेब कोचर, रोहिदास वाळुंज, राणी गायकवाड, माधुरी गायकवाड, बाळशिराम वाळुंज उपस्थित होते.ऋतुजा अशोक आदक, उर्मिला धुमाळ, महेंद्र वाळुंज यांनी मनोगत व्यक्त केले.

वळसे पाटील पुढे म्हणाले मी 25-30 वर्षापासुन लोणी गावात येतोय आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे आमच्या भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहे उर्मिला धुमाळ यांनी पाच वर्षांपूर्वी सरपंच म्हणून सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांनी आज जी कामे या लोणी गावांमध्ये झाली.

त्याच्यासाठी उर्मिला धुमाळ तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो गेल्या सात निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला पाठिंबा दिला मी विधानसभेमध्ये निवडून गेलो दहा वर्षे विरोधी पक्षांमध्ये काम केलं.

आणि इतर वेळेला राज्यातली जवळजवळ सगळेच महत्त्वाचे विभाग मला त्या ठिकाणी सांभाळायला पक्षाने सांगितलं ते करत असताना अनेकांची मदत झाली त्यामध्ये या गावचे सुपुत्र गृहविभागाचे सहसचिव डॉ.कैलास गायकवाड यांच्या सहकार्याने पारगावला नवीन पोलीस स्टेशन सुरु केले. म्हाळसाकांत योजनेचे सर्वेक्षण करून अधिकारी गेले राज्यात घडामोडी घडल्या सरकार गेलं नाही.

तर आम्ही त्या कामाला आणखीन गती दिली असती परंतु ठीक आहे सरकार जरी नसले तरी आपले प्रश्न आपण सोडवायचे मी तर माझ्या विरोधी पक्षाच्या मित्रांना सुद्धा विनंती करेन की आता आपण सगळेच या तालुक्यातले आहोत मते याला दिली का त्याला दिली माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही तुमच्या पक्षाचे सरकार आहे हे झालेलं काम आहे आता उरलेलं काम तुम्ही करून आणा तरी आम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. सूत्र संचालन निलेश पडवळ यांनी केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT