Maharashtra rickshaw panchayat Sakal Media
पुणे

पुणे : महाराष्ट्र रिक्षा पंचायततर्फे घर ते हॉस्पिटल मोफत 'ॲम्बुलन्स रिक्षा'

१०२ रिक्षाचालकांनी घेतला मोहिमेत सहभाग

समाधान काटे

पुणे : महाराष्ट्र रिक्षा पंचायत तसेच आरोग्य सेना यांच्या सौजन्याने पुणे शहरातील कोरोना रुग्ण तसेच इतर रुग्णांना घर ते हॉस्पिटल मोफत 'ॲम्बुलन्स रिक्षा' सेवा २६ एप्रिल २०१९ पासून संपूर्ण पुणे शहरात दिली जात आहे. या उपक्रमात महाराष्ट्र रिक्षा पंचायत या रिक्षा संघटनेमार्फत १०२ रिक्षाचालकांनी सहभाग घेतलेला आहे. यामध्ये संघटनेचे रिक्षाचालक सभासद तसेच इतर रिक्षाचालक हे स्वखुशीने प्रवाशांना एकही रुपया न घेता दिवस-रात्र (२४×७) ही सेवा पुरवत आहेत. पुणे शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातलेला आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाने अगोदरच १५ मे पर्यंत लोकडाऊन घोषित केलेला आहे व ते पुढे वाढण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे गरजेचे आहे. यासाठी रुग्णांनी किंवा नागरिकांनी शफिक पटेल ९८५०४९४१८९ किंवा अरशद अन्सारी ७८४१०००५९८ यांना संपर्क केल्यास तीस मिनिटांच्या आत रिक्षाचालक रिक्षासह आपल्याकडे पोहोचतो व आपल्या इच्छित हॉस्पिटलमध्ये पोहोचवितो. (Pune Maharashtra Riksha Panchayat launches free Ambulance Rickshaw from home to hospital)

'रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा' या सामाजिक जाणिवेतून या संकल्पनेने जन्म घेतला. आजपर्यंत शेकडो रुग्णांनी या मोफत सेवेचा लाभ घेतलेला आहे. तसेच पुणेकर नागरिकांकडून या उपक्रमास खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात दहा ते पंधरा रिक्षा या विशेष रुग्णांसाठी सज्ज असून या रिक्षांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर (पोर्टेबल/ वन टाईम यूज कॅन) उपलब्ध आहेत. तसेच रिक्षाचालकाला किंवा इतरांना संसर्ग पसरू नये, म्हणून पीपीई कीट घालून हे रिक्षाचालक अशा रुग्णांना सेवा देत आहेत" अशी माहिती या उपक्रमाचे प्रमुख कार्याध्यक्ष शफिक पटेल यांनी दिली.

आरोग्य सेनेने यात सामील होऊन आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख व संस्थापक डॉ. अभिजीत वैद्य यांनी या उपक्रमात सामील रिक्षाचालकांना त्यांचा इंधन खर्च देण्याचे घोषीत केले आहे, असे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी सांगितले. आजच्या तारखेस या योजनेत PFN- PUNE FEED THE NEED या संस्थेमार्फत रिक्षाचालकांना रेशन किट, हँड सॅनिटायझर आणि रुग्णांसाठी पंचवीस ते तीस पोर्टेबल ऑक्सिजन कॅनचे वाटप करण्यात आले आहे. यासह काही सामाजिक संस्थेमार्फत गरजू नागरिकांना दररोज १०० ते १२० फूड पॅकेटचे वितरणही महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे रिक्षाचालक करत आहेत. या उपक्रमात शफिक पटेल आणि अरशद अन्सारी यांचेसह संघटनेचे पदाधिकारी कुमार शेट्टी मुराद काजी व इतरांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT