Drug Case esakal
पुणे

Pune Mall Drugs Case: पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन! नवा व्हिडिओ व्हायरल; एफसी रोडच्या घटनेनंतर पुन्हा खळबळ

पुण्यातील एका मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

सकाळ ऑनलाईन

पुणे : पुण्यातील एका मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. पुणे-नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमध्ये असलेल्या पबमधील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ दोन-तीन महिन्यापूर्वीचा असल्याचं कळतंय. साम टिव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. नुकत्याच पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल थ्री बारमध्ये ड्रग्जचं सेवन केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही दुसरी घटना समोर आली आहे. (Pune Mall Drugs Case New Video Viral new incident after FC Road drug case)

या व्हिडिओत दोन तरुणी पबमधील वॉशरुममध्ये जाऊन सेवन करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. या घटनेनंतर तिथला स्टाफ या तरुणींना पकडतो असं यात दिसतं आहे. पण व्हिडिओ दोन ते तीन महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याची कुठलीही गंभीर नोंद घेतली नसल्याचं समोर आलं आहे.

कालच पुण्यातील प्रमुख एफसी रोडवरील एका बारमध्ये ड्रग्जच सेवन केलं जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळं पुणे शहरात ड्रग्जचं रॅकेट कार्यरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्याकाही दिवसानं सातत्यानं ड्रग्जचा साठा आणि सेवन करणाऱ्या तरुणांच्या अनेक घटना समोर आल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT