cosmos
cosmos sakal
पुणे

पुणे : मराठे कुटुंबीयांनी कॉसमॉस बँकेचे साठ कोटींचे कर्ज थकविले

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मराठे ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या रोख रक्कम, सोने चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतविलेल्या ठेवीची रक्कम तसेच त्यावरील परतावा न देता गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रणव मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या गुन्ह्यात मराठे ज्वेलर्स-प्रणव मराठे ज्वेलर्स प्रा. लि.. यांनी कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या किमतीवर ६० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.

आरोपींनी या बँकेकडून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यामुळे बँकेचे त्यांना वसुलीची नोटीस पाठवली आहे. प्रणव मराठे हे मराठे ज्वेलर्स-प्रणव मराठे ज्वेलर्स प्रा. लि. या दोन्ही भागीदारी संस्थांचे प्रत्येकी २० टक्के भागीदार आहेत, अशी माहिती सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी न्यायालयास दिली. या गुन्ह्यात पोलिसांनी प्रणव मिलिंद मराठे (वय २६, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे), कौस्तुभ अरविंद मराठे (वय ५४) आणि मंजिरी कौस्तुभ मराठे (वय ४८, दोघे रा. कर्वेनगर) यांना अटक केली आहे. तर मयत मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे, नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात शुभांगी विष्णू कुटे (वय ५९, रा. शिवतीर्थ नगर, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रणव मराठे ज्वेलर्सची लक्ष्मी रोड तसेच पौड रोड कोथरूड येथील शाखांमध्ये १४ जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

आरोपींनी प्रणव ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने,चांदी आदी गुंतवणूक करायला लावली तसेच फिर्यादींसह एकूण १८ गुंतवणूकदारांची पाच कोटी नऊ लाख ७२ हजार ९७० रुपयांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर प्रभाव टाकला," IPS अधिकाऱ्याचे निलंबन

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

La Nina 2024: यंदाचा ऑगस्ट-सप्टेंबर अति पावसाचा! यावर्षीच्या मान्सूनबाबत IMD ने काय काय सांगितले?

T20 World Cup 2024 : तुफान वादळात स्टेडियमची तुटली स्क्रीन; T20 वर्ल्ड कपपूर्वी 'या' संघांचे सामने रद्द

World Digestive Health Day 2024 : शरीराची बिघडलेली पचनसंस्था फटक्यात होईल ठिक, फक्त हे पाणी प्यायला सुरू करा

SCROLL FOR NEXT