वैद्यकीय  sakal
पुणे

पुणे : वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता

पुणे महापालिकेत येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी गिरवणार धडे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने (एनएमसी) गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असलेली पुणे ही राज्यातील तिसरी महापालिका ठरली आहे. येत्या शैक्षणीक वर्षापासून येथे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवतील.

मुंबई आणि ठाणे या दोन्ही महापालिकांनी स्वतःची वैद्यकीय महाविद्यालये यापूर्वी सुरू केली आहेत. पुण्यातही महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला ठराव ३१ जानेवारी २०१८ रोजी स्थायी समितीमध्ये केला होता. त्यानंतर तीन वर्षे प्रत्येक टप्प्यावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ‘एनएमसी’ने अखेर वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिली. याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यता मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर पाठपुरवठा करताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि आताचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि राज्य सरकारचे मोलाचे सहकार्य मिळाले.’’

या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. पहिल्या वर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. सध्या सणस शाळेत वर्ग व कमला नेहरू रुग्णालयात प्रात्यक्षिकाची व्यवस्था केली गेली आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाच्या परिसरात वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत बांधण्यात येईल. तेथे महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू होणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

अहमदाबादच्या धर्तीवर हे महाविद्यालय उभारण्यात आले आहे. त्यासाठी अधिष्ठात्यांची नियुक्ती केली असून, इतर पदेही भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. या वेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बंगिनवार उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकल्पापासून सिद्धीपर्यंतचा प्रवास या अंतिम मंजुरीने पूर्ण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. अंतिम मंजुरी मिळेपर्यंतच्या सर्व टप्प्यात स्वतः लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करून घेतली.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र न्यास स्थापन केला आहे. त्यात महापालिकेचे पदाधिकारी विश्वस्त आहेत. या महाविद्यालयासाठी दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT