pune metro one lakh 65 thousand punekar use service in two days  sakal
पुणे

Pune Metro : प्रवासी मेट्रोच्या प्रेमात; दोन दिवसांत एक लाख ६५ हजार जणांनी घेतला लाभ

मेट्रोचा प्रवास आता केवळ ‘जॉय राइड’ न राहता तो पुणेकरांच्या दैनंदिनीचा भाग होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मेट्रोचा प्रवास आता केवळ ‘जॉय राइड’ न राहता तो पुणेकरांच्या दैनंदिनीचा भाग होत आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील दोन दिवसांत तब्बल एक लाख ६५ हजार २५६ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. ही संख्या आत्तापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे एक ऑगस्टला उद्‍घाटन झाले. यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते शिवाजीनगर न्यायालय आणि वनाज ते रूबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांचा समावेश होता.

पहिल्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रवासीसेवेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन्ही मार्गांवर १२ हजार ९१८ प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर सहा ऑगस्टला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. सहा ऑगस्टला दोन्ही मार्गांवर ९६ हजार ४९८ प्रवाशांनी प्रवास केला.

त्यानंतर १५ ऑगस्टला प्रवासीसंख्येने उच्चांक गाठला. १५ ऑगस्टला १ लाख २३ हजार ७२० प्रवाशांनी प्रवास केला. ही संख्या सर्वाधिक ठरली. १४ व १५ ऑगस्ट, या दोन दिवसांत दोन्ही मार्गांवर एक लाख ६५ हजार २५६ प्रवाशांनी प्रवास केला.

‘पीएमपी’चाही उच्चांक

१५ ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी असल्याने ‘पीएमपी’ प्रशासनानेदेखील १७ मार्गांवर अतिरिक्त बस सोडल्या होत्या. १५ ऑगस्टला ‘पीएमपी’तून तब्बल साडेबारा लाख प्रवाशांनी प्रवास केला. यातून ‘पीएमपी’ला एका दिवसात एक कोटी ७७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. १५ ऑगस्टला सामान्यपणे १० ते ११ लाख प्रवासी प्रवास करतात.

या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात

  • शिवाजीनगर न्यायालय स्थानक हे भूमिगत स्थानक असल्याने येथे मोबाईलला रेंज मिळत नाही, त्यामुळे ‘यूपीआय’द्वारे तिकीट काढताना अडचणी येतात.

  • तिकिटाची रक्कम अकाउंटमधून कापली जाते, मात्र प्रत्यक्षात तिकीट मिळत नाही. असेही प्रकार घडले आहेत.

  • प्रवाशांना रकमेचा परतावा मिळविण्यासाठी ग्राहकसेवा क्रमांकाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी लागते.

  • तसेच तिकीट स्कॅन करतानादेखील तांत्रिक अडचणी येत असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे.

प्रवाशांच्या मोबाईलला रेंज मिळत नसेल तर तो मोबाईल कंपन्यांच्या सेवेतील दोष आहे. आम्ही कंपन्यांना याबाबत कळविले आहे.

- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक (जनसंपर्क), पुणे मेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT