Home sakal
पुणे

पुणे : मेट्रोग्रस्तांना मिळणार हक्काचे घरे

मेट्रो प्रकल्पामुळे ज्या नागरिकांची घरे गेली आहेत, असा ६० नागरिकांना भाड्याने घर देण्याऐवजी ते घर त्यांच्या मालकीहक्काचे करण्याचा निर्णय मुख्यसभेत घेण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : शहरात होणाऱ्या मेट्रो प्रकल्पामुळे (Metro Project) ज्या नागरिकांची घरे (Homes) गेली आहेत, असा ६० नागरिकांना भाड्याने घर देण्याऐवजी ते घर त्यांच्या मालकीहक्काचे करण्याचा निर्णय आज (गुरवारी) मुख्यसभेत उपसूचनेद्वारे घेण्यात आला. मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांना महापालिकेला आर सेव्हन अंतर्गत मिळालेली घरे किंवा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) घरांमध्ये पुनर्वसन केले जात आहे.

यामध्ये वडगाव बुद्रूक मधील सुविधा प्रकल्पा अंतर्गत ताब्यात आलेली ६० घरे तीन वर्षाच्या कालावधीसाठी प्रती महिना ३ हजार ५५ रुपये आकारून भाडेकराराने देण्यात यावीत व त्यासाठी सदनिकाधारकांशी करार करण्यास मंजुरी द्यावी असा प्रस्ताव आज मुख्यसभेत मंजुरीसाठी आला.

मेट्रोमुळे नागरिकांची घरे कायमस्वरूपी गेली आहेत. भाडे करार संपल्यानंतर पुन्हा त्यांना निर्वासित व्हावे लागेल. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी हक्काचे घरी दिले पाहिजे, अशी भूमिका शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी सभागृहात मांडली. त्यास सर्वांनी पाठिंबा देऊन भाडेकराराने घर देण्याऐवजी मालकी हक्काने द्यावीत ही उपसूचना मान्य करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानपरिषद निकालानंतर भाजपचे आरोप, शिवसेनेनं प्रत्युत्तर देत नागपूरवरून डिवचलं; म्हणाले, आत्मपरीक्षणाची गरज

Gokul Chairman Election Postponed in Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर, महायुतीचे संचालक गैरहजर; कोरमअभावी सभा तहकूब, सतेज पाटील काय करणार?

MLC Results : उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तशी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर... नागपूर, पुण्यात भाजपच्या पराभवानंतर केशव उपाध्ये यांची पोस्ट चर्चेत

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

IND vs NZ, 4th T20I: ईशान किशन फिट झाला, तर Playing XI मधून बाहेर कोण जाणार? सॅमसन-सूर्यवंशीबाबत काय निर्णय घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT