Crime News sakal
पुणे

Pune : मेट्रोच्या सुरक्षारक्षकावर पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार

डेक्कन पोलिसांकडून दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मेट्रोच्या प्रकल्पात काम करणाऱ्या एका सुरक्षारक्षकावर दोघांनी पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. हि घटना डेक्कन जिमखाना येथे शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांना अटक केली.

राेहीदास उभे (वय २६,रा. भुगाव, ता. मुळशी) असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्यांनीच डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर जितेश उर्फ प्रतीक रामचंद्र कदम (वय १८, रा. खिलारेवाडी, कर्वे रस्ता) , अभिषेक राजेंद्र उभे (वय १९, रा. सुतारदरा, कोथरूड) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उभे हे एका खासगी कंपनीमार्फत डेक्कन येथील मेट्रोच्या कामावर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहेत.

आरोपी व फिर्यादी हे एकमेकांना ओळखतात. त्यांची काही दिवसांपूर्वी आरोपींबरोबर भांडणे झाली होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता फिर्यादी हे डेक्कन येथील यशवंतराव चव्हाण पूलावर (झेड ब्रीज) उभे थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपीनी उभे यांना शिवीगाळ, मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये उभे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान,आरोपीनी झेड ब्रीज परिसरात दहशत निर्माण करुन ते पसार झाले. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT