pune sakal
पुणे

Pune : खडकवासला मतदारसंघात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

विधानसभा मतदारसंघातली महाविकास आघाडीने नोंदवला निषेध.

विठ्ठल तांबे

धायरी : लखिमपुर खिरी येथील शेतकऱ्यांनचा नरसंहार झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज "महाराष्ट्र बंद" ची हाक दिली आहे.खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना, आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी या बंद ची हाक दिली आहे.सिंहगड रस्ता परिसरात व्यवसायिकांकडून  संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसला. महाविकास आघाडी तील कार्यकर्त्यांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तर काही दुकान दारांनी स्वतः हुन दुकाने बंद ठेवली आहेत. खडकवासला मतदारसंघामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला.

महाराष्ट्र बंदची हाक दिली असली तरी वडगाव धायरी, नऱ्हे ,नांदेड, किरकीटवाडी,खडकवासला या भागात संमिश्र असल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावरही नेहमी प्रमाणेच वर्दळ असल्याचे चित्र होते. त्याचबरोबर महाविकास आघाडी कडून चौकाचौकातून निषेध आंदोलन करण्यात आले.

तर सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुला खाली महागाईच्या विरोधात तसेच उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना चिरडण्याचा घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले .

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, खडकवासला मतदार संघ अध्यक्ष काका चव्हाण, कॉंग्रेसचे श्रीरंग चव्हाण, मिलिंद पोकळे,राहुल मते, शिवसेनेचे नितीन वाघ, तसेच शरद दबडे, सौरभ मते, भूपेन्द्र मोरे, विकास कामठे, दत्ता नाना रायकर, गोकुळ करंजावने, स्वाती पोकळे, सुनीता डांगे, कुणाल पोकळे,चंद्रशेखर पोकळे,, प्रभावती भूमकर, धनंजय पाटील ललिता कुटे, संदीप मते, संजय पोळ, महेश विटे उपस्थित होते .

"या भागात राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, काँग्रेस (महाविकास आघाडी )कडून ता. 10 रोजी व्यापाऱ्यांना महाराष्ट्र बंद साठी दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती. यातून भाजीपाला, औषध, किराणा मालाची दुकानं वगळली असून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कडूनविविध चौकातून निषेध आंदोलन व मोर्चा काढला असल्याचे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण यांनी सांगितले.

"विरोधक जेव्हा आम्हाला विचारतात त्यांना सांगू इच्छिते सत्तर वर्षात आम्ही काय केले तर आम्ही कधी संविधान जाळले नाही,शेतकऱ्यांच्या हत्या करायला लावल्या नाही ,शेतकऱ्यांनवर कधी लाठीमार केला नाही.खोट्या जाहिराती लावून आम्ही कधी महिलांची फसवणूक केली नाही.आम्ही समजतील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांचा सन्मान केला."

-रुपाली चाकणकर -महिला प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT