पुणे

Pune : ...तर अंगावर येण्याच्या घटना घडतात; बिबवेवाडीत वानरांचा उच्छाद, नागरीक त्रस्त

इमारतीच्या गच्चीवर, गॅलरीत काही ठेवलेले असेल ते अस्ताव्यस्त करून नुकसान करतात.

सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी - गावठाण सह लगतच्या परिसरातील सोसायटय़ां व टेकडी लगतच्या भागात वानरांच्या टोळक्याने उच्छाद मांडलेला असून दहशत व नुकसानीमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.

तळजाई, सहकार नगर, बिबवेवाडी परीसरात अनेक मोठय़ा सोसायटय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात झाडी आहे त्यामुळे येथे अनेक प्रकारच्या पक्षांचा वावर असतो वर्षातून एकाद वेळेस माकडे, वानर यांचा वावर याठिकाणी आढळून येतो. यावर्षी वानरांच्या टोळक्याने बिबवेवाडी पाण्याच्या टाकीच्या परिसरात मुक्काम ठोकला असून लगतच्या सोसायटय़ांमध्ये जाऊन झाडांच्या कुंड्या, कपडे, वाळत टाकलेले धान्य आदी वस्तूंचे नुकसान करत आहे,

त्यांना हाकलायला गेले तर अंगावर येण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे भीतीने त्यांना हाकलून देता येत नसल्याचे नागरीक सांगतात.पाण्याच्या टाकीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात झाडी आहे त्यामुळे वानरे हाकलून लावली तरी झाडी मध्ये पळून जातात.दुपार नंतर वानरे येतात इमारतीच्या गच्चीवर, गॅलरीत काही ठेवलेले असेल ते अस्ताव्यस्त करून नुकसान करत असल्याचे चांगुणाई नगर येथील रहिवासी प्रमोद नागवडे यांनी सांगितले.

उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून खाद्य व पाण्याच्या शोधात वानरे मानवी वस्तीत येत आहे, नागरिकांनी त्यांना डिवचू नये, डिवचल्यास ते प्रतिहल्ला करू शकतात असे पशुपक्षी प्रेमी विशाल हांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: कर्मा रिपीट्स... मनोज जरांगे खूप महागात पडेल, धनंजय मुंडेंनी दिला इशारा! CBI चौकशीची मागणी

Stray Dogs Case: महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर भटके श्वान आणि प्राण्यांना प्रवेशबंदी! सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश

Dombivli Traffic: शहरातील कोंडी फुटणार! मोठागाव रेल्वे फाटकावरील प्रकल्पात मोठा बदल; काय असेल नवा प्लॅन?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत 44 कोटीचा डांबर घोटाळा

"हा सिनेमा चालणार नाही" माहेरची साडी सिनेमा पाहिल्यावर दादा कोंडकेनी पुतण्याला घेतलेलं फैलावर ; म्हणाले..

SCROLL FOR NEXT