Pune
Pune  Sakal
पुणे

Pune : आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेचा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बरोबर सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा

कँटोन्मेंट: प्ले स्टोअर मधून एखादे ॲप डाऊनलोड करून ते इन्स्टॉल करणेही बाब सद्यपरिस्थितीत कोणालाही नवीन वाटत नाही, परंतु शालेय विद्यार्थ्यांनी स्वतः एखादे ॲप तयार करणे ही बाब मात्र नक्कीच नाविन्यपूर्ण आहे. अशाच ॲप निर्मितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी आचार्य श्री विजय वल्लभ प्रशाला व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यातील सामंजस्य करार नुकताच झाला. यावेळी झालेल्या करारामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय देशातील पातळीवर इतर विद्यार्थाबरोबर एकत्रित काम करण्याचीही सुवर्णसंधी मिळणार आहे.

यावेळी टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेसचे अमेरिकेहून आलेले जॉन डिचियारा Global golT Head, व अँडम हार्टले Global goiT specialist यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्हिसेस कडून व प्रशाले तर्फे शाळेचे चेअरमन सुभाष परमार यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षच्या केल्या.सदर करारा अंतर्गत विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रगतीशील शैक्षणिक तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक योजनाअभ्यासक्रमात अंतर्भाव असणाऱ्या दैनंदिन जीवनातील विविधसमस्या, शैक्षणिक माहिती व लोन सल्लागार, ताण तणावव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वातावरण व पर्यावरण समतोल,आदी उपाययोजनांवर लैगिक समानता, झाड़े वाचवाआधारित विविध ॲपची निर्मिती कशी करावी याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रत्यक्ष ॲप निर्मितीचे धडे विद्यार्थीगिरवणार आहेत. आपल्या आजूबाजूला दिसणाच्याविविध शैक्षाणिक, सामाजिक व सांस्कृतिकप्रश्नांवर नाविन्यपूर्ण उपायांची निर्मिती करण्यासाठीविद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उददेश आहे. याअनुषंगाने विज्ञान-तंत्रज्ञान- असूनत्या इंजिनिअरिंग-गणित (STEM) व कम्प्युटर सायन्स विषयाचीआवड निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे मत संस्थेचेचेअरमन सुभाष परमार यांनी व्यक्त केले.

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसतर्फे golT हा प्रशिक्षणाचा कार्यक्रमजागतिक पातळीवर 40 हूनअधिक देशांमध्ये राबविला जात आहे. त्याच बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आलेले विभागीय प्रमुख सुरजित चौधरी, अजित भोईर, पुणे प्रमुख निखिल पट्टणशेट्टी व प्रशिक्षण प्रमुख प्रीती शिंदे यांनी शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी एकूण 120 संगणक असणाऱ्या व तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण अशा तंत्रस्नेही शाळेतील सुविधांचे व इथे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतूक केले.

तसेच या परदेशी पाहुण्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. व अभ्यासक्रमांतर्गत केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी 60 संगणकांनी परिपूर्ण असणाऱ्या व संपूर्ण देशातील पहिली भाषा प्रयोगशाळा अशी ओळख निर्माण केलेल्या शाळेतील चंद्रप्रकाश भाषा प्रयोगशाळाची माहिती घेऊन शालेय अभिमानास्पद अशी असणे स्तरावर असल्याचे नमुद केले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे प्रकल्प प्रमुख विपुल शहा यांच्या सहकार्यामुळेच हा सामंजस्य करार करण्यास पाठबळ मिळाले.

सदर कार्यक्रमाला शाळा समितेचे पदाधिकारी विजयराज रांका,सुरेश परमार, पुखराज संघवी, राजू मुथा, सुरेश मुथा तसेच टाटाकन्सल्टन्सी सर्हिसेसचे पदाधिकारी उपस्थित होते. शाळेच्यामुख्याध्यापिका मानसी मारुलकर व शिक्षक कल्पेश दर्जी, महेशराऊत, दीपाली तारे, विमल परदेसी, दीपज्योती अ्रे, इतिषा शहाव दिपाली दवणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT