एमटीडीसी
एमटीडीसी Sakal
पुणे

पुणे : 'एमटीडीसी' पर्यटकांना निखळ आनंद देण्यास सज्ज

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नववर्षाचे स्वागत आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा आनंद देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) सज्ज झाले आहे. पर्यटकांची ओढ निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे दिसून येत आहे. नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा तसेच पुणे विभागातील महाबळेश्वर, लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही पर्यटनस्थळे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत.
पर्यटकांना स्वच्छ, रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पाहत होते. महामंडळ आणि पर्यटकांचीही ही आतुरता संपली आहे. सर्व पर्यटक निवासे जवळपास फूल्ल झाली आहेत. रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी पर्यटकांचा निसर्गाकडे कल दिसून येत आहे.

स्थानिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल
सध्या कोरोनाच्या नवा विषाणूचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परंतु ‘एमटीडीसी’ची पर्यटक निवासे आणि रिसॉर्ट खुली आहेत. पर्यटक निवासांमध्ये ‘सांताक्लॉज’ चॉकलेटबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देणार आहे. पर्यटकांसाठी पर्यटनासोबतच स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

वैद्यकीय सुविधा उपलब्ध
महामंडळामार्फत पर्यटकांच्या आरोग्यासाठी पर्यटक निवासे, उपाहारगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज स्प्रे, ऑक्सीमिटर, मास्क, हातमोजे अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

पर्यटक निवासांचे ९० टक्के आरक्षण
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक हे ‘एमटीडीसी’च्या पर्यटक निवासांना प्राधान्य देत आहेत. डिसेंबरमध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जवळपास ९० टक्के आरक्षण झाल्याची माहिती ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणार
‘एमटीडीसी’कडून स्थानिक कलाकार, पर्यटन व्यावसायिक आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. योगा आणि वेलनेस शिबिरे घेण्याचे प्रस्तावित आहे. स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन महामंडळाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी तत्पर आहोत. पर्यटकांना निखळ पर्यटन, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थांचा आस्वाद दिला जात आहे. तथापि पर्यटकांनी निसर्गाचे आणि कोरानाचे भान ठेवून पर्यटनाचा, नववर्ष स्वागताचा आनंद घ्यावा.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT