Pune-Mumbai express way sakal
पुणे

Pune Mumbai Express Way वर वाहनांची बेशिस्त वाढली; अहवालातून स्पष्ट

विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाल्यानतर पोलिस विभाग अॅक्शन मोडवर आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या शिस्तीमध्ये वाढ झाली असून मागच्या एका महिन्यात (पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर) ओव्हर स्पिडींग, लेन कटिंग, सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर पोलिसांचा वाहतूक विभाग अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी बेशिस्तपणाची आकडेवारी जाहीर केली आहे.

(Pune Mumbai Express Way Latest Updates)

पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर नागरिक बेभान होऊन गाड्या चालवत आहेत असं दिसून आलं असून सप्टेंबर महिन्यात ओव्हर स्पिडींग चे १६,००० चलन पोलिसांनी दाखल केले आहेत तर ५००० वाहनांनी लेन कटिंग केली, अशी माहिती हायवे पोलिसांनी दिली आहे. पुणे हद्दीत गेल्या महिन्यात ७९८ वाहनांवर लेन कटिंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली तर २७५ गाड्यांवर ओवर स्पिडींग तर ५५ गाड्यावर सीट बेल्ट न वापरता गाडी चालवण्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे.

लेन कटिंग घटना (गेल्या १ महिन्यात)

  • पुणे विभाग: ७९८

  • मुंबई विभाग: ४२३४

ओव्हर स्पिडींग (गेल्या १ महिन्यात)

  • पुणे विभाग: २७५

  • मुंबई विभाग: १६,०१६

सीट बेल्ट न लावून वाहन चालवणे (गेल्या १ महिन्यात)

  • पुणे विभाग: ५५

  • मुंबई विभाग: १४९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT