covid file photo
पुणे

हद्दीबाहेरच्या रुग्णांवर पालिकेकडून उपचार

सकाळ डिजिटल टीम

पुणे- राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रुग्णांना वेळेवर उपचार देखील मिळत नाहीत. अशा स्थितीत पुणे महापालिका हद्दीबाहेरच्या रुग्णांसाठी मोठा आधार ठरली आहे. गेल्या महिन्याभरात पालिकेच्या सीओईपी जम्बो रुग्णालयात २२५० रुग्णांनी उपचार घेतले, त्यामध्ये तब्बल ६५० रुग्ण हे पालिका हद्दीच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरात रोज हजारो जणांना कोरोनाची लागण होत होती, त्यामुळे पालिकेच्या जम्बो रुग्णालयासह बाणेर येथील कोवीड रुग्णालय, लायगुडे, दळवी, नायडू या पालिका व शासनाच्या ससून रुग्णालयावर मोठा ताण निर्माण झाला. रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण फिरावे लागत होते.

पुणे शहरातील ही स्थिती असताना बेड्स वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच वेळी पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण येथील यंत्रणा अपुरी पडत होत. नगर, सोलापूर, सातारा सांगली या भागात देखील गंभीर रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी पुण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.महापालिकेच्या जम्बो रुग्णालयामध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. औषधे, जेवण देखील महापालिकाच देते. आत्तापर्यंत अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जम्बो रुग्णालयात बेड रिकामा झाला की लगेच तेथे दुसरा रुग्ण दाखल होत होता. यावेळी हा रुग्ण पुणे शहरातील आहे की हद्दी बाहेरचा आहे याचा विचार न करता जीव वाचविणे या दृष्टीने प्रवेश देऊन उपचार केले आहेत.

२३ मार्च ते २३ एप्रिल या एका महिन्यामध्ये सीओईपी जम्बो रुग्णालयात एकूण २ हजार २५० रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी १ हजार ६०० रुग्ण महापालिकेच्या हद्दीतील आहेत. तर पिंपरी चिंचवड १००, पुणे ग्रामीण २०० तर दुसऱ्या जिल्ह्यातील ३५० रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. रुग्‍णालयात एक रुग्ण १० दिवस रहातो, त्यावर रोज सरासरी ६ हजार रुपये खर्च होत आहे. पालिकेने कोरोनाच्या स्थितीत रुग्ण कुठला आहे हे न पाहात त्याला उपचाराची गरज आहे हे ओळखून जम्बोत दाखल करून घेतले. बाहेरच्या रुग्णांचा भार पालिकेवर पडत असला तरी, लोकांचे प्राण महत्त्वाचे आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णसंख्या कमी होऊनही बेड फुल्ल

गेल्या एक दीड आठवड्यापासून पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, पण ऑक्सिजनचा पुरवठा, रेमडेसिव्हिरची मागणी यामध्ये कपात झालेली नाही. शिवाय गंभीर रुग्ण, रुग्णांचे मृत्यू यांचेही प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामागे पुणे शहर व जिल्ह्याच्या बाहेरील रुग्ण दाखल होत असल्याने हे प्रमाण कमी होत नसल्याचेही समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT