Pune Municipal Corporation allows work from home for disabled employees 
पुणे

पुणे महापालिकेने दिले दिव्यांग कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे दिले आदेश

शरयू काकडे

पुणे : राज्य सरकारच्या आदेशानुसार दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यक्षेत्र सोडून जाऊ नये, आवश्यकता भासल्यास तत्काळ उपस्थित राहावे, या अटीवर ही मुभा देण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढल्याने राज्यात लॉकडाउन लावण्यात आला आहे. लॉकडाउनमध्ये सरकारी कार्यालयातील उपस्थिती १५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. मात्र, आरोग्य व महापालिका यंत्रणांना ५० टक्के व गरजेनुसार १०० टक्क्यांपर्यंत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आहे. अशा व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती सर्वसामान्यांच्या तुलनेत तितकीशी चांगली नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करणे त्रासदायक होते. त्यामुळे राज्य सरकारने सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित रहाण्यापासून सूट देऊन ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT