Pune Municipal Corporation and CREDAI started ICU department in Dalvi Hospital in just eight days.png 
पुणे

पुणे महापालिका अन् क्रेडाईने करुन दाखवल: अवघ्या ८ दिवसात 'या' हॉस्पिटलमध्ये ICU सुरु

सकाळवृत्तसेवा

पुणे : ठरविले तर कोणीतही गोष्ट अशक्‍य नाही. मग आपत्ती असली, तरी त्याचे रूपांतर इष्टापतीत होऊ शकते. पुणे महापालिका आणि क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने एकत्रित येत हे करून दाखविले. अवघ्या आठ दिवसात एक कोटी रूपये खर्च करून शिवाजीनगर येथील महापालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये अद्यायावत अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू करण्यात आला. या अतिदक्षता विभागाच्या उभारणीसाठी आलेला सर्व खर्च क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या उपस्थितीत या अतिदक्षता विभागाचे हस्तांतरण करण्यात आले. पुणे महानगर पालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, मुख्य शहर अभियंते प्रशांत वाघमारे, क्रेडाई पुणे मेट्रोचे पदाधिकारी तेजराज पाटील व आय. पी. इनामदार आदी यावेळी उपस्थित होते. 

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

या अतिदक्षता विभागात खाटा, व्हेंटिलेटर, डिफिलेटर, सक्‍शन मशीन, इसीजी मशीन इत्यादी अशा अद्ययावत उपकरणांचा समावेश असून सध्याच्या काळात कोविड 19 शी लढणा-या रुग्णांना यामुळे अद्ययावत सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत. 
यासंदर्भात सुहास मर्चंट म्हणाले, " पंधरा दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी क्रेडाई पुणे मेट्रोला कोविड 19 च्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी दळवी रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारावा या संदर्भात आवाहन केले. त्यावेळी आम्ही पुढील आठ दिवसात महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये अद्ययावत अतिदक्षता कक्ष उभारू असे आश्वासन दिले. आमच्या पदाधिका-यांनी निधी उपलब्ध करून देत आठ दिवसांच्या कालावधीत रुग्णांच्या सेवेसाठी हे आयसीयु युनिट तयार केले.' 

ठरलं : पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडणार

तर आयुक्त गायकवाड म्हणाले, "शहरातील शिवाजीनगर भागातील दळवी रुग्णालय हे महिलांच्या प्रसूतीसाठीचे या भागातील एकमेव रुग्णालय होते. या ठिकाणी आता या संकटाच्या काळात अद्ययावत अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने या भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. विक्रमी वेळेत तयार झालेला हा अतिदक्षता विभाग महानगरपालिकेच्या इतिहासात नोंद करण्यासारखा टप्पा झाला आहे. महानगरपालिकेच्या वतीने मी क्रेडाई पुणे मेट्रोचे आभार मानतो.' यावेळी महापौर मुरली मोहोळ यांचे देखील भाषण झाले. 
"लिव्ह इन रिलेशनशिप'"मध्ये राहणाऱ्या जोडप्यात लॉकडाऊनमुळे उडाले खटके; मग...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT