Flat  esakal
पुणे

Property Tax : तुमच्या रिकाम्या सदनिकेवर मिळकतकराच्या रकमेतून मिळू शकतो परतावा

पुणे शहरात तुमच्या दोन सदनिका आहेत. एका सदनिकेत तुम्ही राहता, तर दुसरी सदनिका बंद असल्यास त्या सदनिकेच्या मिळकतकराच्या रकमेतून तुम्हाला काही रकमेचा परतावा मिळू शकतो.

उमेश शेळके -@sumesh_sakal

पुणे - शहरात तुमच्या दोन सदनिका आहेत. एका सदनिकेत तुम्ही राहता, तर दुसरी सदनिका बंद असल्यास त्या सदनिकेच्या मिळकतकराच्या रकमेतून तुम्हाला काही रकमेचा परतावा मिळू शकतो.

सलग तीस दिवसांहून जास्त काळ एखाद्या जागेचा भोगवटा (वापर) होत नसेल आणि त्यापासून भाड्याचे उत्पन्न मिळत नसेल तर जितके दिवस जागा रिकामी आहे त्यानुसार परतावा मागता येईल. मिळकतकरातून वसुली केलेली पाणीपट्टी, साफसफाई कराच्या रकमेचा परतावा मागता येईल. जागा साठ दिवसांपेक्षा जास्त काळ रिकामी राहिल्यास सर्वसाधारण कराच्या रकमेच्या दोन तृतीयांश रकमेचा परतावा मिळू शकतो.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील प्रकरण आठमध्ये करआकारणीच्या तरतूदी आहेत. नियम क्रमांक ५६ (१) मध्ये जागा रिकामी राहिल्याने मालमत्ता कराच्या (मिळकतकर) रक्कम परताव्याबाबत तरतुदी आहेत. करआकारणी करण्यात आलेली मालमत्ता तीस दिवसांहून अधिक काळ बंद असेल अथवा साठ दिवसांहून अधिक काळ बंद असलेल्या मालमत्तेसंदर्भात संबंधित जागा मालकांना कसा परतावा देता येईल, त्यांचे अधिकार कोणाला आहेत, जागा मालकांना कशा प्रकारे मालमत्ता कराचा परतावा मागता येईल, याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. मोकळी जागा म्हणजे काय याचीही व्याख्या या करण्यात आली आहे.

मिळकतकर आकारणीवरून शहरात सध्या अनेक वादविवाद सुरू आहे. मालक स्वतः: राहत असल्यास अशा सदनिकाधारकांना मिळकतकरात चाळीस टक्के सवलत देण्यात येईल, अशी भूमिका महापालिका आणि राज्य सरकारने देखील घेतली आहे. त्यामुळे एखाद्या मालकाच्या पुणे शहरात दोन सदनिका आहेत, तर अशा मालकांना एकाच सदनिकेला म्हणजे ते स्वतः: राहात असलेल्या सदनिकेला ही सवलत मिळणार आहे.

दुसऱ्या सदनिकेला मात्र सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु कायद्यातील तरतूद तपासल्यानंतर शहरात दोन किंवा तीन मालकीच्या सदनिका असलेल्या मिळकतदारांना काही प्रमाणात परताव्याच्या माध्यमातून सवलत मिळू शकते हे स्पष्ट झाले आहे. सदनिका विशिष्ट काळ बंद असल्यास मालकांना महापालिकेकडे अर्ज करून परतावा मागता येईल.

रिकाम्या जागेची कायद्यानुसार व्याख्या

  • जागेचा वापर होत नसेल, भाड्याचे उत्पन्न मिळत नसेल, तरच ती जागा रिकामी

  • जागा फेब्रुवारीत रिकामी राहिली असेल आणि तो कालावधी तीस दिवसांपापेक्षा कमी नसेल, तर ती जागा रिकामी

  • मालकाने जागा स्वत:च्या वापरासाठी सुसज्ज केली किंवा राखून ठेवली असेल अशावेळी तो वापर करत असो अथवा नसो सवलत मिळणार नाही

  • भाडेकरूला जागा भाड्याने दिली असेल, भाड्याचे उत्पन्नदेखील मिळत असेल तर परतावा मागता येणार नाही.

परतावा कसा मागता येईल

  • जागा रिकामी असल्याविषयी मालकाने आयुक्तास लेखी नोटीस दिल्याशिवाय मालकत्ताकराच्या परताव्याची रकमेची मागणी करता येणार नाही

  • जागा रिकामी झाल्यापासून सात दिवसांच्या आत नोटीस देणे बंधनकारक

एकाच मालकाच्या दोन सदनिका असतील, तर एकाच सदनिकेला (राहात असलेल्या) चाळीस टक्क्यांची सवलत देणार असा महापालिकेचा हट्ट आहे. मग महापालिकेने एमएमसी ॲक्टमधील प्रकरण आठ मधील तरतूद क्रमांक ५६ चा वापर करून भाडेकरू न ठेवणाऱ्या एकाच मालकाच्या दुसऱ्या सदनिकेला परतावा दिला पाहिजे. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळेल. नागरिकांनीही या तरतुदीची माहिती घेऊन महापालिकेकडे परतावा मागवावा.

- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क संस्था

नागरिकांनी यासंदर्भात अर्ज केल्यानंतर त्याची कायदेशीर बाजू तपासून योग्य निर्णय घेण्यात येईल.

- अजित देशमुख, कर आकारणी व कर संकलन प्रमुख, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT