Pune Municipal Corporation Illness plagued the General Assembly Mayor Murlidhar Mohol Positive SAKAL
पुणे

महापालिकेच्या मुख्यसभेला आजारपणाने ग्रासले, महापौर पाॅझिटीव्ह

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : ओमिक्राॅनच्या संसर्गामुळे शहरात रोज हजारो रुग्णांचीभर पडत असताना महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी पाॅझिटीव्ह असल्याने त्याचा फटका पुणे महापालिकेच्या मुख्यसभेच्या कामकाजाला बसला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांना आज कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले असून,जानेवारी महिन्यात होणारी ही मुख्यसभा ही विद्यमान नगरसेवकांची अखेरची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लागल्याने नगरसेवकांना वर्गीकरणासह त्यांचे महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करून घ्यायचे असल्याने गडबड सुरू आहे.

राज्यात ओमिक्राॅनचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने महापालिकेच्या मुख्यसभेसह सर्वच बैठकांवर निर्बंध आणत हे कामकाज आॅनलाईन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने आॅनलाईन मुख्यसभा घेण्याचे नियोजन केले आहे, तरीही आजारपणामुळे कामकाज होऊ शकलेले नाही.

शहरातील कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करताना सभागृहनेते गणेश बीडकर यांनी " महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सात ते आठ जण आजारी आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे देखील तब्येत बरी नसल्याने आजच्या मुख्यसभेला उपस्थित राहू शकले नाहीत," अशी माहिती सभागृहात दिली. तर गेल्या आठवड्यात सभागृहनेते बीडकर हे स्वत: आजारी असल्याने मुख्यसभा एक आठवडा तहकूब करावी लागली होती, त्यानंतर आता सलग दुसऱ्या आठवड्यातही हीच परिस्थिती ओढावली आहे.

मुरलीधर मोहोळ पाॅझिटीव्ह

महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे पाॅझिटीव्ह असताना आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे आज (ता. २७) स्पष्ट झाले. महापौर हे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर दुपारनंतर त्रास होत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असला ते पाॅझिटीव्ह असल्याचे समोर आले. मोहोळ यांना दुसऱ्यांदा लागण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT